सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीच्या सुपेश दाभाडे चा अकॅडमी तर्फे जल्लोषात सत्कार....
जळगाव जामोद प्रतिनिधी...
मागील पाच वर्षापासून सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी जळगाव जामोद व परिसरातील विद्यार्थ्यांचा दणदणीत निकाल लावत असून यावर्षी सुद्धा निकालाची यशोगाथा कायम व अव्वल राहिली आहे... सुपेश हा मध्यमवर्गीय कुटुंबातील व सेमी इंग्लिश मधून माध्यमिक शिक्षण झालेला विद्यार्थी आहे , इयत्ता अकरावीच्या प्रवेशानंतर त्याचे बरेचसे मित्र हे अकोला नांदेड सारख्या मोठ्या शहरांमध्ये क्लासेस साठी गेले व त्यांनी सुपेश ला सुद्धा तिथे येण्यासाठी आग्रह केला.परंतु सुपेशने सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी येथील फ्री फाउंडेशन कोर्स करून आधीच शिक्षकांचे अध्यापन बघितले होते.त्यामुळे त्यांनी येथेच राहण्याचा निर्णय घेतला... व सतत कोणतेही ऑनलाइन वर्ग किंवा इतर स्टडी मटेरियल वा टेस्ट सिरीज न वापरता सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी वरच 100% विश्वास ठेवला परिणामी आज सुपेश त्याच्या अकोला नांदेड गेलेल्या मित्रांपेक्षा जास्त मार्क्स घेऊन PCM CET (97.626) मध्ये यशस्वी झालेला आहे.... अकॅडमी वर ठेवलेला विश्वास आणि त्याने केलेली जीवतोड मेहनत यामुळेच आज तो यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलेला आहे...मोठ्या शहरात नावाजलेले क्लास, मोठमोठे हॉल, डिजिटल एज्युकेशन च्या नावाखाली बड्या गोष्टी, मुलांच्या एन्ट्री व एक्झिट वर बायोमेट्रिक अशा बाबींना सामान्य पालक ‘विशेष’ समजून आपल्या पाल्याचा प्रवेश घेतात पण हजारोंची विद्यार्थी संख्या व अध्यापनाची काठीण्य पातळी यामुळे हव्या तशा निकालापर्यंत पोहोचू शकत नाही... सुपेश चा जळगाव जामोद मध्ये शिकून सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी ने लावलेला हा निकाल मोठ्या शहरात जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी एक मोलाचा संदेश देणारा आहे...