देऊळघाट येथे बकरी ईद उत्साहात संपन्न, पोलीस प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्त...!
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
जिल्हाच्या मुख्यालयापासून जवळच असणाऱ्या तसेच मुस्लिम बहुल ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळघाट येथे ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री गजानन कांबळे,API गोकुळ सिंग राठोड,पोलिस हेड कॉन्स्टेबल श्री तायडे व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी यावेळी बंदोबस्त ठेवल्याने गावात शांतता पूर्वक बकरी ईद च्या मुस्लिम बांधवांचा कुठलाही अनुचित प्रकार ना घडता उत्साहित पार पडला,यावेळी सकाळी ८.३० ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम धर्म बांधवांनी सामूहिकरित्या नमाज पठण जमा मस्जिद (मरकज) चे मौलाना मुक्ती मुजिब यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले की शासनाने ठरवून दिलेल्या आदेशाप्रमाणे नियमांचे पालन करून इतर धर्माच्या मन्ना दुखता आपला सण साजरा करावा ,याच वेळी देशाच्या प्रगतीसाठी तसेच शांतता व प्रेमभाव कायम राहावा तसेच देशाची मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना केली.या कार्यक्रमाचे वेळी बुलढाणा विभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांचे सह इतर पोलीस अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थित होते. मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांचे आदेशानुसार ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.