एकदिवसीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न_मान्सूनपूर्व काळात आपत्ती व्यवस्थापनात सर्व घटकांनी सज्ज राहावे-- तहसीलदार राजेश वझीरे..


 
एकदिवसीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न_मान्सूनपूर्व काळात आपत्ती व्यवस्थापनात सर्व घटकांनी सज्ज राहावे-- तहसीलदार राजेश वझीरे..

अकोला जिल्हा प्रतिनिधी...

दि.2 जुन 2025 रोजी मान्सूनपूर्व तयारी चे नियोजनाच्या अनुषंगाने एकदिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणी रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार सर यांचे आदेशाने काटेपुर्णा धरणावरील गुप्तेश्वर संस्थान वाघा गड हाॅलवर करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेश वाझीरे सर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी बार्शीटाकळी, प्रमुख उपस्थितीत मुर्तिजापूर नायब तहसीलदार रविंद्र राऊत सर,जि.आ.व्य.अ. संदीप साबळे साहेब, एसडीआरएफ नागपूर चे प्रमुख मार्गदर्शक पो.उ.नि. अमोल गोखले सर,उपस्थीत होते यामधे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाचे आजचे प्रशिक्षक पोलीस हवालदार एस.टी. शेख पोलीस हवालदार जे.जी. थुल पोलीस नाईक पि.एम. कावडकर पोलीस नाईक आर.आर.मेहर पोलीस शिपाई एस.एम.गाडगे यांनी पुर,आग, भूकंप, विज,प्रथमोपचार, आणी आपत्ती व्यवस्थापन व निवारण तसेच मान्सूनपूर्व सज्जेते विषयी योग्य मार्गदर्शन देऊन प्रात्यक्षिक करून दाखविले यामधे रेस्क्यु बोट व शोध व बचाव साहीत्यांची ओळख देऊन आणी त्यास हाताळण्या बाबत योग्य माहीती दिली.तसेच तहसीलदार राजेश वझीरे सरांनी आपत्ती व्यवस्थापन आणी जबाबदारी यावर मार्गदर्शन केले,आपत्ती व्यवस्थापन टीम चे सदस्य प्रशांत सायरे मं.अ.बाळापूर, सुनिल कल्ले से निवृत्त तलाठी,हरिहर निमकंडे मं.अ.अकोला,प्रेमदास दामोदर होमगार्ड नायक ऑफीसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमांचे सूत्र संचालन जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन चे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.आ.व्य.अ.संदीप साबळे साहेब यांनी केले आभार प्रदर्शन नै.आ.व्य.कक्ष बार्शीटाकळी तहसीलचे सुशांत आठवले साहेब यांनी केले.वरील कार्यक्रमात जिल्ह्य़ातील विविध विभागांचे शासकीय निमशासकीय प्रतिनीधी तथा आयटस चे नोडल मॅनेजर फय्याज अहेमद मुलानी, पद्माकर आंम्बे,सुभान बागवान,प्रणाली मानवे,आणी जिल्ह्य़ातील सर्व आपदा मित्र,मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक पिंजर,वंदेमातरम आपत्कालीन पथक कुरणखेड,विर भगत सिंग आपात्कालीन पथक काटेपूर्णा, मा चंडिका माता आपात्कालीन पथक काटेपुर्णा  चे सदस्य आणी सर्व मंडळ अधिकारी तलाठी सरपंच, पो.पाटील,इत्यादी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बार्शीटाकळी तहसील चे सर्व कर्मचारी तलाठी यांनी परिश्रम घेतले अशी माहीती जि.आ. व्य.अ.संदीप साबळे यांनी दिली.

Previous Post Next Post