वनश्री ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे यांना दीक्षांत समारंभात साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लिट्रेचर (डी-लीट)पदवी प्रदान...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
बुलढाणा जिल्हा खामगाव येथील जेष्ठ समाजसेविका तथा प्रतिभावंत साहित्यिक, शिक्षण, मूल्यशिक्षण आणि सामाजिक सुधारणा साहित्याच्या गाढ्या अभ्यासक, "आदर्श शिक्षक पुरस्कार" प्राप्त शिक्षिका, प्रबोधनकार वनश्री ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाची डॉक्टर इन लिट्रेचर (डी-लीट) मानद आचार्य पदवी दि.२१ जून २०२५ रोजी "इगमोर हाॅटेल रामदा चेन्नई" येथील सभागृहात भव्य दिव्य अशा दीक्षांत पदवीप्रदान समारंभात प्रदान करण्यात आली.यावेळी अध्यक्षस्थानी श्री. आर. सेलवम अध्यक्ष ग्लोबल अचिव्हर्स कौन्सिल यांची उपस्थिती होती.तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. जे.हरिदास.अधिवक्ता उच्च न्यायालय हे होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा.कुलगुरू डॉ .श्री.ए.एम.मूर्ती तमिळनाडू शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विद्यापीठ चेन्नई,श्री.व्ही.शेखर.भारतीय चित्रपट दिग्दर्शक,लोकप्रिय निर्माता,श्री. सेंथिल.भारतीय चित्रपट दिग्दर्शक-निर्माता व विनोदी कलाकार,श्री. अँड्र्यू टेलर.सल्लागार-सावू गॅक,श्री. बालशेखरन.भारतीय चित्रपट दिग्दर्शक,डॉ.मिलिंद दहिवले.भारत सरकार सदस्य-दिल्ली अल्पसंख्याक आयोग,या मान्यवरांची प्रमुख उपस्थित होती.शिक्षण आणि मूल्यशिक्षण या विषयांमध्ये पारंगत असलेल्या ऊर्मिलाताई ठाकरे यांनी डी.एड,बी.ए,बी.एड, तसेच चार विषयात एम.ए,व शिक्षण शास्त्रात एम एड, झालेले असून सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे येथे त्या पी.एच.डी पूर्ण होत आहे. त्यांचा शिक्षणक्षेत्रातील शिक्षक,पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख,शिक्षण विस्तार अधिकारी असा चाळीस वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे.त्यांचे शिक्षणक्षेत्रातील कार्य उत्कृष्ट, उल्लेखनीय व अभिनंदनीय आहे. त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने दि.०५ सप्टेंबर २००७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय:ना.मा.विलासरावजी देशमुख यांनी "राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार-सन २००७" देवून त्यांना सन्मानित केले आहेऊर्मिला ताईंचे १०(दहा ) पुस्तके प्रकाशित झालेले आहेत. तसेच त्यांनी स्तंभलेखिका म्हणून "दैनिक देशोन्नती" या वृत्तपत्रात सन २००१ ते २०१० तब्बल दहा वर्ष सातत्याने दररोज A/4 पेज "दैनंदिन शालेय परिपाठ" (मूल्यशिक्षण तासिका) या नावाने स्तंभलेखन केलेले आहे.त्यांनी विद्रोही साहित्य,पटकथा,गझल,कविता,स्तंभलेखन,कथालेखन आदि.... साहित्याच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा, परिवर्तन व्हावे यासाठी साहित्य लेखन केलेले आहे.सोबतच कलाक्षेत्रात सुद्धा त्या मागे नाहीत त्यांनी रंग मंचावर कलाकार म्हणून"साहसी विजय","छोटा जादुगार" या बाल चित्रपटात व "सन्डे को शुट है" या टेली फिल्म मध्ये सुद्धा अभिनय केला आहे.त्यांना डॉक्टर इन लिट्रेचर (डी.लीट) मानद आचार्य पदवी शिक्षण, मूल्यशिक्षण आणि सामाजिक सुधारणा साहित्य या विषयांसाठी प्रदान करण्यात आली आहे.दीक्षांत पदवीप्रदान समारंभाचे प्रास्तविक आर.सेलवम् यांनी केले तर संचलन श्रीमती आयुषा यांनी केले व आभार प्रदर्शन कन्नैय्या जैस्वाल केले.भव्य दिव्य अशा पदवीदान प्रदान दीक्षांत समारंभाची सांगता मोठ्या थाटामाटात संपन्न झाली.