जिल्हा परिषद मराठी शाळा वडगाव गड येथे शाळेचा पहिला दिवस साजरा....


 
जिल्हा परिषद मराठी शाळा वडगाव गड येथे शाळेचा पहिला दिवस साजरा....

ओम उन्हाळे/वडगाव गड...

जिल्हा परिषद मराठी शाळा, वडगाव गड येथे नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षक, पालक आणि गावकरी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गावात रंगीबेरंगी रॅली काढून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पुस्तके आणि शूज यांचे वाटप करण्यात आले. या वाटपामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे आयोजन केले.“विद्यार्थ्यांचे स्वागत आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे,” असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या उत्साहपूर्ण प्रारंभाने शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी झाली असून, विद्यार्थ्यांमध्ये नव्या जोमाने शिकण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Previous Post Next Post