मोताळ्यातील सोलर प्लांट प्रकरणाला नवे वळण..अखेर ओ 2 प्लांटची परवानगी रद्द...आझाद हिंदच्या लढ्याला अखेर यश...


 
मोताळ्यातील सोलर प्लांट प्रकरणाला नवे वळण..अखेर ओ 2 प्लांटची परवानगी रद्द...आझाद हिंदच्या लढ्याला अखेर यश...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

बहुचर्चित मोताळ्यातील सोलर प्लांट ला अखेरची घरघर अखेर लागली आहे. सदर प्रकरणात दैनंदिन नवीन वळण कारवाईच्या माध्यमातून मिळत आहे. परवानगी पासून बनावट दस्तऐवजांच्या  विळख्यात सापडलेला सोलर प्लांट संचालक व नगरपंचायतच्या पाच आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल झाल्याने पुन्हा चर्चेत आला होता.तर सद्यस्थितीत मोताळ्यातील वादग्रस्त ओ टू  सोलर प्लांट ची उपविभागीय अधिकारी मलकापूर यांनी दिलेली परवानगी स्वतःच्याच आदेशान्वये त्यांनी  रद्दबातल  केल्याने जिल्ह्यातील प्रशासनासह राजकीय क्षेत्रातली मोठी खळबळ जनक घटना आहे.बनावट ना हरकत प्रमाणपत्र देऊन उपविभागीय अधिकारी मलकापूर यांची परवानगी मिळवल्याप्रकरणी नगरपंचायत नगराध्यक्ष सह इतर पाच जणांवर भादवी संहिते नुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे ज्या आधारावर उपविभागीय अधिकारी मलकापूर यांनी परवानगी दिली तो आधारच बनावट असल्यामुळे देण्यात आलेली परवानगी  रद्दबातल केल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे.सोलर प्लांट संचालक व इतर आरोपीवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने सदर परवानगी रद्द करण्याची मागणी वरिष्ठांकडे लावून धरली होती. त्यामुळे उपविभागीय कार्यालय मलकापूर आदेश  क्र.अ.का./प्र.- 1कावि/522/ 2025/ दिनांक 21/03/2025 अन्वये ओ 2  एनर्जी प्रा. लि.तर्फे अमन कुमार शर्मा यांना मौजे मोताळा येथील गट नंबर 16, 170, 172, 173, 179,183, 184, 186, 188, 189,190,227,231, 232,233, 234, 235, 236, 237,247 देण्यात आलेली परवानगी सनद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 व त्या अंतर्गत नियमानुसार रद्द करण्याचे आदेश पारित केले आहे. तसे आदेश  क्र.कावि/प्र.- 1/ 997/2025 नुसार रद्द केल्याचे आदेश पारित झाले आहे. 

_

आझाद हिंदमुळे प्रकरणाला नवे वळण.

मोताळा नगरपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या ओ 2 पावर प्रावेट लिमिटेड च्या वतीने सायकल एनर्जी पावर प्रायव्हेट लिमिटेड मार्फत सुरू असलेल्या सोलर प्लांट प्रकल्पावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी नगरपंचायत गणेश पांडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया संत गतीने सुरू होती. सदर गंभीर प्रकरणात गुन्हे दाखल व्हावे, नगरपंचायत मोताळाच्या बनावट नाहरकत वरून उपविभागीय अधिकारी मलकापूर  यांनी काढलेले आदेश रद्दबातल करावे अशी मागणी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी सातत्याने लावून धरली होती. त्यामुळे 28 दिवसानंतर गुन्हे दाखल झाले. असे असताना पोलीस विभागाकडून फिर्यादी बदलण्यात आले. यासह उपविभागीय अधिकारी मलकापूर यांनी काढलेले आदेश सुद्धा गैर कायदेशीर असल्यामुळे रद्द करण्यात  यावे. अशी मागणी आझाद हिंद च्या वतीने लावून धरल्यामुळे दैनंदिन सोलार प्लांट प्रकरणात नवीन वळण येत आहे. प्रस्तुत प्रकरणात आझाद हिंद ने दिलेला कायदेशीर प्रशासकीय लढा महत्त्वपूर्ण ठरला आहे.

Previous Post Next Post