घरामध्ये छापा टाकून देशी - विदेशी दारू पकडली. 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...जलंब पोलिसांची कारवाई.


 
घरामध्ये छापा टाकून देशी - विदेशी दारू पकडली. 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...जलंब पोलिसांची कारवाई.

सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

जलंब पोलिसांनी राहत्या घरामध्ये छापा टाकून देशी - विदेशी व हातभट्टीची दारू असा एकूण 23 हजार 670 रुपयाचा माल पकडला असल्याची घटना दि.2 जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास येथे घडली.जलंब येथील एका राहत्या घरामध्ये देशी विदेशी व हातभट्टीची दारू अवैध रित्या विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली यावरून जलंब पोस्टेचे ठाणेदार अमोल सांगळे यांनी आपल्या सहकार्यासह राजपूत पुऱ्या मध्ये छापा टाकून हरपालसिंग जगतपालसिंग राजपूत यांच्या घरातून  आय बी 38 शिशा किं. 6460, रॉयल स्ट्रॉंग 5 शिशा किं. 1000 हजार, एमडी नं 1 किं.1440 रुपये, देशी दारू बॉबी संत्रा किं. 3570 , हात भट्टी दारू 19 लिटर किं. 1900 ,मोह सडवा 90 लिटर किं. 9 हजार, प्लॅस्टिक कॅन किं.300 रुपये असा एकूण 23 हजार 670 रुपयाचा माल पकडून मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी फिर्यादी पोका किशोर बोदडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी आरोपी हरपाल सिंग राजपूत यांच्या विरुद्ध अप नं 135/25 कलम 65 ई महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअन्वे गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई ठाणेदार अमोल सांगळे, नन्हेखा तडवी, गोविंदा होनमाने, किशोर बोदडे, भागवत काकडे, शेख अंजुम ,पवार ,चालक जितेश म्हसणे आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे...

Previous Post Next Post