वरवट बकाल येथील अवैध गुटखा विक्रेत्यावर तामगाव पोलिसांची कारवाई ! 28 हजारांचा मुद्देमासह एकास पकडले,


 
वरवट बकाल येथील अवैध गुटखा विक्रेत्यावर तामगाव पोलिसांची कारवाई ! 28 हजारांचा मुद्देमासह एकास पकडले,

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर  तालुक्यात असलेले तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत वरवट बकाल येथील साई किराणा दुकानावरील अवैध प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या एका आरोपींविरुद्ध तामगाव पोलिसात गुन्हा दाखल करून 28 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कारवाई 19 जुलै रोजी 10 वाजता दरम्यान घडली आहे.तामगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे साई किराणा दुकानात अवैध गुटखा विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.यावरून तामगाव पोलिसांनी 19 जुलै रोजी रात्री 10 वाजताच्या दरम्यान छापा टाकून एका आरोपीस अवैध गुटखा विक्री करतांना अटक केली. प्रतिबंधीत अवैधरित्या गुटखा संबंधीत झडती घेतली असता विमल गुटखाचे ३८ पाकीट , सुगंधीत तंबाखुचे २० पाकीट, केसर युक्त पान मसालाचे २२ पाकीट , व्हि सुगंधीत तंबाखुचे पाऊच असलेले ११० पाकीट , सुगंधीत तंबाखुचे प्रत्येकी २२ पाऊच असलेले ७९ पॅकेट , 1 जर्दाचे ३० पाऊच असलेले १३ पॅकेट , असा सर्व मिळून २८ हजार २३३ रुपयाचा प्रतिबंधीत गुटखा मिळून आला मुद्देमाल जप्त करुन तामगाव पोस्टेला जमा करण्यात आला. अन्न औषध प्रशासन विभागाला लेखी कळविल्या वरून अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांनी मुद्देमालाचा पंचासक्षम पंचनामा केला व तामगाव पोस्टेला अन्न सुरक्षा अधिकारी वसावे यांच्या फिर्यार्दी वरून तामगाव पोस्टेला 21 जुलै रोजी आरोपी विनोद भगवान धर्मे राहणार वरवट बकाल याच्या विरूध्द अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अन्वये कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आरोपीस संग्रामपूर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेन्द्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोउपनि विलास बोपटे करित आहे.

Previous Post Next Post