केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिरात लोकशाही पद्धतीने विद्यार्थी निवडणूक प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली...!!
जळगाव जामोद प्रतिनिधी...
सहकार विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला तसेच शाळेच्या मुख्य संयोजिका डॉ. सौ स्वाती किशोर केला यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक 2025 चे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांची, मतदान प्रक्रियेची तसेच प्रॉक्सी वोट बद्दल माहिती होणे व त्यांच्यात सामाजिक सक्षमता, नेतृत्व कौशल्य, जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने शालेय पंतप्रधान, वर्गाचा मुख्यमंत्री , शिक्षणमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, आरोग्य व खाद्यमंत्री, माहिती व प्रसारण मंत्री, क्रीडामंत्री, पर्यावरणमंत्री इत्यादी पदांसाठी विद्यार्थी निवडणूक घेण्यात आली. नितीन बेंदरकार सर यांनी विद्यार्थ्यांना प्रॉक्सी व्होट या बद्दल माहिती दिली आणि मतदान प्रक्रियेसाठी उपस्थित न राहू शकलेल्या प्राचार्य राजेश लोहिया सर व प्रा. धूत सर ह्यांचे प्रॉक्सी मतदान करून प्रात्यक्षिकही दिले.या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सर्वांचे प्रेरणास्थान असलेले काकाजी, डॉ. सौ. स्वाती किशोर केला तसेच प्रा. विनायक उमाळे, विनोद ईश्वरे, शाळेच्या पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे, मनीषा म्हसाळ यांनी उपस्थिती दर्शवली.या निवडणूक प्रक्रियेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शपथ ग्रहण समारंभात शाळेचे प्राचार्य मा. विनायक उमाळे सर यांनी तनवी राजेश केदार हिला पंतप्रधान, वेदिका शांतीलाल धिरबस्सी (शिक्षण मंत्री), वेदा नितीन तडस (सांस्कृतिक कार्य मंत्री), श्रद्धा विनेश बारेला (पर्यावरण मंत्री), आयुष प्रकाश खडसान (आरोग्य व क्रीडा मंत्री ) तर योगराज भूपेंद्र अवचार (माहिती व प्रसारण मंत्री ) या पदासाठी तर वर्ग मंत्री मंडळातील मुख्य मंत्री व मंत्री विद्यार्थ्यांना वर्गशिक्षकांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ अरुणा व्यवहारे,मनीषा म्हसाळ, साकेत गिरजापुरे सर, योगेश घुटे सर, नितीन बेंदरकार सर व सर्व शिक्षक वृंद यांनी मोलाचे योगदान दिले.