फिर्यादी बदला: आरोपीला अटक करा.आझाद हिंदचा आठ दिवसांचाअल्टिमेट. 2 सोलर प्लांट मुद्दा पावसाळी अधिवेशनात..!गैर कायदेशीर सोलर प्लांटला आझाद हिंद ताला ठोकणार...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
मोताळ्यातील गैरकायदेशीर रित्या उभा करण्यात आलेल्या ओ 2 सोलर प्लांट कंपनी संचालक आणि आरोपींना पाठीशी घालणाऱ्या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी.नियमानुसार कायदेशीर तथा प्रशासकीय कारवाई करावी.आरोपींना पुरावे नष्ट करण्यापूर्वी अटक करावे, फिर्यादी बदलून नियमानुसार गुन्ह्यांची नोंद करावी, यासह इतर मागण्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने तीन जुलैला राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह संबंधित विभाग प्रमुखांना ई-मेल द्वारे निवेदन सादर करीत कारवाई करण्याची मागणी सहाव्या स्मरणपत्रातून केली आहे. एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराची आणि गैर कायदेशीर रित्या उभारण्यात आलेल्या सोलर प्लांटची जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची तसदी घेतली नाही. यावर खंत व्यक्त करीत प्रश्न उपस्थित करण्याची जाहीर मागणी सुद्धा केली आहे. तर आठ दिवसात नियमानुसार कायदेशीर कारवाई न झाल्यास गैर कायदेशीर रित्या सुरू करण्यात आलेल्या ओ 2 सोलर प्लांटला टाळा ठोकण्याचा इशारा आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील यांनी दिला आहे.
_
शासन प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनामध्ये
मोताळा नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या बहुचर्चित अनधिकृत ओ 2 सोलर प्लांट संचालक आणि नगरपंचायत मोताळाच्या नगराध्यक्ष सह पाच सदस्य आणि कर्मचाऱ्यांवर बनावट दस्तऐवज बनवणे, शासनाची दिशाभूल करणे, मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करणे, बनावट शिक्के तयार करणे, प्रकरणी अपराध क्रमांक 283/2025 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. परंतु सदर गुन्हे नोंदविताना त्यामध्ये भादवी कलम 471,120 ब दाखल नसून मूळ तक्रारदार फिर्यादीला बाजूला सारून स्वतः चौकशी अधिकारीच फिर्यादी झाले आहे. तर फिर्याद नोंदविताना घटनाक्रम 11/03/2023 ते 18/03/2023 असा चुकीचा नोंदविण्यात आला आहे. वास्तविक घटनाक्रम बनावट ना हरकत बनविण्यापासून त्याचा लाभ आणि तक्रार नोंदविणे पर्यंत असणे कायदेशीर दृष्ट्या क्रमाप्राप्त आहे. यासह बनावट ना हरकतवर देण्यात आलेली आकूर्षक परवानगी नुकतीच उपविभागीय अधिकारी मलकापूर यांनी अध्यादेशाद्वारे रद्द केली आहे. परंतु सदर परवानगी आदेश रद्द करीत असताना मलकापूर उपविभागीय कार्यालयाची दिशाभूल करणे, फसवणूक करणे प्रकरणी प्रशासकीय तथा कायदेशीर कारवाई करणे सुद्धा कर्मप्राप्त आहे. त्याचबरोबर विनापरवानगी झालेली वृक्षतोड याकडे संबंधित वनविभाग प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. अद्यापही इतर सह आरोपी यांचा तपास लागलेला नाही मुख्य आरोपींना अटक करण्यात आली नाही. अधिक प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी आझाद हिंदणे आठ दिवसांचा अल्टिमेट शासन प्रशासनाला देत अनधिकृत ओ 2 सोलर प्लांटला ताला ठोकण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
