स्व. पंकज देशमुख यांच्या मृत्युची सीआयडी चौकशी साठी आज 4 जुलै रोजी जळगाव जामोद शहर बंदची हाक...


स्व. पंकज देशमुख यांच्या मृत्युची सीआयडी चौकशी साठी आज 4 जुलै रोजी जळगाव जामोद शहर बंदची हाक...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

स्व. पंकज देशमुख यांच्या मृत्युची सीआयडी चौकशी करावी या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 4 जुलै 2025 रोजी जळगाव जामोद शहर बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबत न्याय हक्क जन आंदोलन समितीने एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे जाहिर केले आहे. प्रसिद्धि पत्रकात नमूद आहे की, स्व. पंकज उत्तमराव देशमुख, भाजपा कार्यकर्ता जळगाव जामोद ह्याची 3 मे 2025 रोजी त्यांच्या वायाळ शिवारातील शेतात लहान झाडाला फाशी घेतल्याने मृत्यु झाल्याचे कोणतीही चौकशी न करता प्रथम दर्शनी दाखविले आहे. स्थानिक पोलिस प्रशासनाने या मृत्युची चौफेर बाजूने तपासणी न करता आत्महत्या असल्याचे पत्रकाराना सांगितले. मात्र स्व. पंकज उत्तमराव देशमुख यांचे कुटुंब व नातेवाईक त्यांची हत्याच असल्याचे आग्रही मत होते, आजही आहे. याबाबत न्याय हक्क जन आंदोलन समिती तसेच मृतकची पत्नी सुनिता पंकज देशमुख यांनी वेळवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना वारंवार सीआयडी मार्फ़त चौकशीची मागणी केली आहे व करीत आहे परंतु प्रशांसन त्याकड़े गांभिर्यने पाहत नाही असे पोलिसांच्या आजवरच्या तपासावरून दिसत आहे. त्याकरिता सर्व पक्ष, व सामाजिक संघटना तसेच विविध क्षेत्रात असलेल्या संघटना यांच्याशी झालेल्या चर्चे नुसार जनमताचा आदर करीत स्व. पंकज देशमुख व त्यांचे कुटुंबाला न्याय देण्याकरीता व प्रशासनाला जागे करण्याकरीता स्व. पंकज देशमुख यांच्या हत्येची सीआयडी चौकशी व्हावी या मागणी करीता न्याय हक्क जन आंदोलन समिती ही 4 जुलै रोजी जळगाव जामोद शहर बंदची हाक दिली आहे. तरी स्वयंस्फूर्तीने बंद व्हावे असे न्याय हक्क जन आंदोलन समितिच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post