सावत्र बापाने आईच्या चिमुकल्या 'दर्शन' ची केली हत्या...चिमुकला दर्शन सुखरुप घरी परतावा ही आईची प्रार्थना खोटी ठरली...
सय्यद शकिल/अकोट....
राजस्थान चौक, अकोट येथील नऊ वर्षांचा दर्शन वैभव पळसकर बेपत्ता झाल्याने काल दुपारपासून सुरू झालेल्या शोधाला आज सकाळी अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक वळण मिळाले. चिचोना फार्म येथील गोमुखाजवळ एका बोरीमध्ये दर्शनचा मृतदेह आढळून आला असून, धक्कादायक म्हणजे, त्याच्या सावत्र पित्यानेच त्याची निघृण हत्या केल्याचे समोर आले आहे.आई ने मोठ्या विश्वासाने दर्शन ला शाळेत सोडण्यासाठी त्याचा हा त्याच्या वडीलांच्या हातात दिला.आणि शाळेत सोडण्याच्या बाहण्याने सावत्र बापाने दर्शनला पहिले बेपत्ता केले आणि मग त्याचा खुन केल्याची माहिती समोर आली आहे.काल दुपारी ३ वाजल्यापासून दर्शन कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याने त्याच्या कुटुंबियांनी अकोट शहर पोलिसांशी संपर्क साधला होता.त्यानंतर दर्शनचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल,अकोट शहरचे ठाणेदार अमोल माळवे, ग्रामीण ठाणेदार किशोर जुनघरे,अकोट शहर डीबी टीमसह तब्बल ६० पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रभर शोधमोहीम राबवली.मार्डी,खिरकुंड आणि आसपासच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांनीही या शोधकार्यात पोलिसांना सक्रिय मदत केली.रात्रभर चाललेल्या या शोधमोहिमेत प्रत्येकजण दर्शन सुखरूप घरी परतावा अशीच प्रार्थना करत होता.मात्र आज सकाळी चिचोना फार्म येथील गोमुखाजवळ एका बोरीमध्ये दर्शनचा निष्प्राण देह आढळल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.प्राथमिक माहितीनुसार, त्याच्या सावत्र पित्यानेच हे क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे.या घटनेने अकोट शहरात हळहळ व्यक्त होत आहे.नऊ वर्षांच्या चिमुकल्याचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने नागरिक सुन्न झाले आहेत.पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून,आरोपी सावत्र पित्याला ताब्यात घेतले असल्याची शक्यता आहे.या घटनेने समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून,अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
--अमरावती जिल्ह्यातील दोघे अटकेत--
या प्रकरणात पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी च्या हिरापूर येथील आकाश साहेबराव कान्हेरकर, गौरव वसंतराव गायगोले यांना अटक केली आहे. दरम्यान, ही हत्या का केली याचा शोध लावला जात आहे. अकोट चे उपविभागीय अधिकारी अनमोल मित्तल यांनी स्वतः तपास हाती घेत काल रात्री पासून या प्रकरणाचा शोध घेतला. त्याच बरोबर त्यांच्या मदतीला सात ऑफिसर आणि ६० अमलदार या प्रकरणात सोबत होते. आज सकाळी दर्शनचे शव प्राप्त झाल्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती अनमोल मित्तल यांनी दिली.या प्रकरणात चार्जशीट लवकरच सादर करू भारतीय न्याय संहितेच्या दिशानिर्देशानुसार या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
