अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देण्यात यावी यासह विविध मागण्या करीता मनसेचे न.प.समोर एकदिवसीय धरणे आंदोलन...विविध राजकीय पक्ष व संघटनांनी दर्शविला जाहीर पाठिंबा...


 
अतिक्रमणधारकांना  पर्यायी जागा देण्यात यावी यासह विविध मागण्या करीता मनसेचे न.प.समोर एकदिवसीय धरणे आंदोलन...विविध राजकीय पक्ष व संघटनांनी दर्शविला जाहीर पाठिंबा...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

मागील काही दिवसापुर्वी खामगाव शहरात नगर परिषदेकडून अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविण्यात आली होती. यावेळी शहरातील गोरगरीब अतिक्रमणधारकांच्या दुकानांवर बुल्‍डोजर चालविण्यात आला होता.त्‍यामध्ये अनेक गोरगरीब अतिक्रमणधारकांचे मोठ्या प्रमाणावर  नुकसान झाले होते. व ज्‍या भागातून सदरचे अतिक्रमण काढण्यात आले. तिथे तार कंपाउड करण्यात आल्‍याने अतिक्रमण धारकांवर उपासमारीची वेळ आल्‍याने शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना त्‍यांच्या जुन्या जागेवरच गाळे/ दुकाने अल्‍पदरात बनवून द्यावे  किंवा त्‍यांना पर्यायी जागा उपलब्‍ध करुन द्यावी यासह अतिक्रमणधारकांच्या विविध मागण्यांसाठी आज  २५ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर परिषदेसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी  अतिक्रमणधारकांनी तसेच शहरातील विविध राजकीय पक्षांनी व त्‍यांच्या पदाधिकाऱ्यांनी या धरणे आंदोलनास पाठींबा दर्शविला.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी संजय पळसकार सहकार सेना राज्‍य उपाध्यक्ष, अशोक पाटील जिल्‍हा उपाध्यक्ष, जयसराम सातव तालुकाध्यक्ष, आनंद गायगोळ शहराध्यक्ष, आकाश पाटील शहर उपाध्यक्ष, आकाश वानखडे तालुका उपाध्यक्ष, सागर भोपळे तालुका उपाध्यक्ष, सागर हरसुले विद्यार्थी सेना, सोनु खपसे तालुका संघटक, करण दिक्षित शहर उपाध्यक्ष, कामगार सेनेचे विनोद इंगळे, नरेंद्र म्‍हस्‍के, विजय मांडवेकर, निलेश श्रीनाथ, गजानन घ्यार, दिपक सुलताने, भागवत उगले, सागर जगदाळे आदि मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्‍थित होते. तसेच अतिक्रमणधारकांमध्ये देवा उबाळे, अण्णा नागेश्वर, प्रितम माळवंदे, विक्‍की जैन, पियुष चव्‍हाण, रवि माळवंदे, निलेश बिबे, संतोष काकडे,सोनु चव्हाण,पवन माळवंदेसह मोठ्या संख्येने अतिक्रमणधारक बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

यांनी दिला आजच्या आंदोलनाला पाठिंबा...

1 खामगाव बेरोजगार अतिक्रमण धारक संघटना ,2 उ.बा.ठा. शिवसेना महिला आघाडी,3 टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य,4 संभाजी ब्रिगेड  5 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट, 6 राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ,7 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट , 8 शिवसेना खामगाव तालुका उ.बा.ठा गट ,9 शिवसेना शिंदे गट,10 प्रहार जनशक्ती पक्ष

Previous Post Next Post