नागरिकांना त्रास देणाऱ्या भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांवर कारवाई कारवाईची जिल्हाधिकारी यांच्याकडे राजेश लहासे यांनी केली मागणी...


 
नागरिकांना त्रास देणाऱ्या भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांवर कारवाई कारवाईची जिल्हाधिकारी यांच्याकडे राजेश लहासे यांनी केली मागणी...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

मुख्यालय सहाय्यक व इतर कर्मचारी  उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय जळगाव जामोद यांची खातेनीय चौकशी करून कारवाई करणे बाबतचे  निवेदन  जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे करण्यात आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील बहुतांश कामेही ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेली आहे बाहेरगाहून येणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कल काढणे शेतीची घराची मोजणी करणे नकाशा काढणे वारस चीनोंद करणे  मोजणी शीट काढणे यासाठी अर्ज करावा लागतो ऑनलाइन पद्धतीने अर्जदार हा कुठूनही अर्ज करू शकतो व त्याला आवश्यक आवश्यक असणारी कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने मिळणे गरजेचे आहे व दिलेल्या वेळेत मिळणे गरजेचे आहे. परंतु जळगाव जामोद येथील कार्यालयामध्ये नियमानुसार कोणतेच कामकाज चालत नाही कारण कार्यालयात कर्मचारी व अधिकारी हजर राहण्याची वेळ ही सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांची असताना भूमि अभिलेख येथील अधिकारी व कर्मचारी हे सकाळी ११ नंतर कार्यालयात उशिरा येतात.या ठिकाणी मुख्यालय सहाय्यक यांनी स्वतःचाच खासगी माणूस कार्यालयात बसून ऑनलाइन पद्धतीने लोकांकडून पैसे घेऊन प्रति अर्ज पाचशे रुपये घेऊन अर्ज भरल्या जातात तसेच बाहेरील सेतू किंवा सीएससी सेंटर वरून येणारे अर्ज हेतू परस्पर नामंजूर केल्या जातात किंवा त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी काढल्या जाते.तसेच मोजणीसाठी व इतर कामासाठी जर यांना पैसे दिले तर ते काम ताबडतोब त्रुटी असताना सुद्धा मंजूर करून दिल्या जाते. व जे लांबचा प्रवास करून बाहेरगावावरून शेतकरी  अर्ज करण्यासाठी येतात त्यांना पुन्हा-पुन्हा या कार्यालयात चकरा माराव्या लागतात व दिलेल्या तारखेवर काम केल्या जात नाही किंवा वेळेत त्यांना कागदपत्रे दिले जात नाही. जे पैसे देतील त्यांचे काम लवकर केल्या जाते. या अशा सर्व प्रकाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी. व दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य ओबीसी परिषदेचे अध्यक्ष राजेश लहासे यांनी दिनांक १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Previous Post Next Post