"राष्ट्रीय एकता मस्जिद परिचय सद्भावना संमेलन" – पत्रकारांसाठी विशेष आयोजन, राष्ट्रीय एकतेस समर्पित...
सय्यद शकिल/अकोला...
राईट-वे फाउंडेशन, अकोला यांच्या वतीने आयोजित "राष्ट्रीय एकता मस्जिद परिचय सद्भावना संमेलन" हा विशेष कार्यक्रम रविवार, 13 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता मॉमिनपुरा मस्जिद, फुलारी गल्ली, अकोला येथे आयोजित करण्यात येत आहे.हा कार्यक्रम विशेषतः पत्रकार बांधवांसाठी आयोजित करण्यात आला आहे, जेणेकरून ते मस्जिदचे सामाजिक एकात्मता, सौहार्द आणि मानवतेच्या केंद्रस्थानातील महत्त्व जाणून घेऊ शकतील.या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते मौलाना मुहम्मद इस्माईल कासमी (लातूर) हे असतील.या संमेलनात मस्जिदचा सामाजिक योगदान आणि विविध घटकांमधील संवादातील भूमिका अधोरेखित केली जाणार आहे. समाजातील सर्व स्तरांमधील एकात्मता व ऐक्याचे संदेश देणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.कार्यक्रमानंतर सर्व पाहुण्यांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली आहे.