आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात जळगाव तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न..
जळगाव जामोद प्रतिनिधी...
आगामी जिल्हा परिषद पंचायतसमिती निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीची बैठक कृषीऊत्पन्न बाजार समिती सभागृहात संपन्न झाली..
सदर बैठकीत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका संदर्भात या बैठकीत चर्चा झाली तसेच प्रत्येक गावातील समस्यांबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करणे प्रसंगी आंदोलन करणे अशा सूचना नेते मंडळींनी आपल्या भाषणात दिल्या. तसेच जि . प. सर्कल निहाय व नगरपरिषद प्रभागानुसार बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या . तसेच नगरपरिषद करीता इच्छुक उमेदवारांनी शहराध्यक्ष यांच्याकडे उमेदवारी मागणी अर्ज सादर करावे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती करिता इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष ॲड भालेराव साहेब यांच्याकडे जमा करावे अशा सूचना देण्यात आल्या.
सदर बैठकीत डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर बैठकीचे अध्यक्षस्थानि होत्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सोशल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष श्लोकांनद डांगे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड भालेराव, अंबादासजी बाठे , कैलासभाऊ बोडखे, अच्छेखा पठान, अब्दुल जहिर ,समाधान दामोधर आदी काँग्रेसचे पदाधिका-यांची भाषणे झाली आदि कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..