कोल्हटकर महाविद्यालयात नवीन कायदे व सायबर क्राईम विषयावर कार्यशाळा संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
नवीन कायदे व सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दिनांक ११ जून रोजी महाविद्यालयाच्या प्रशस्त हॉलमध्ये संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश मायी हे होते. पीएसआय नारायण सरकटे, पीएसआय प्रशांत झेंडगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन मानकर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पीएसआय नारायण सरकटे व पीएसआय प्रशांत झेंडगे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता शारद व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले यानंतर प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी केले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक गणेश जोशी यांनी केले.तंत्रज्ञानाच्या या युगात विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा सुरक्षित आणि सजग वापर करावा, तसेच नवीन कायदे, विशेषतः सायबर क्राईम संदर्भातील नियमांचे ज्ञान असावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शन करताना पीएसआय प्रशांत झेंडगे यांनी सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे युवकांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियाचा गैरवापर, खोट्या लिंकवर क्लिक करणे, बँक खात्यांची माहिती शेअर करणे यासारख्या प्रकरणां पासून सावध राहण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले.त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन कायदे, सायबर गुन्ह्यांची उदाहरणे, तसेच या गुन्ह्यांसाठी असलेल्या शिक्षेच्या तरतुदी सविस्तरपणे सांगितल्या. कोणतीही फसवणूक होऊ नये किंवा विद्यार्थ्यांकडून नकळत अपराध घडू नये यासाठी त्यांनी अनेक उपयुक्त सल्ले दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गिरीश मायी यांनी विद्यार्थ्यांनी सध्याच्या डिजिटल युगातील धोके समजून घेऊन सावधगिरी बाळगावी असे सांगत योग्य मार्गदर्शन घेत जीवनात यशस्वी वाटचाल करावी, असे आवाहन केले.या कार्यशाळेस कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक रामेश्वर सायखेडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आणि कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने कार्यशाळेला उपस्थित होते.