पतसंस्था संचालक व कर्मचारी यांचे एकदिवसीय प्रशिक्षण...आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025..
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
दिनांक 13 जुलै 2025 रोजी बुलढाणा जिल्हा नागरी व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थाचा संघ म.बुलडाणा द्वारा आयोजित पतसंस्था संचालक व कर्मचारी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग बुलढाणा येथील बुलढाणा रेसिडेन्सी क्लब येथे होते..या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन राधेश्यामजी चांडक यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक महेद्र चव्हाण (जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा )प्रमुख पाहुणे डॉ.सौ.स्वातीताई संदिप वाकेकर (उपाध्यक्ष बुलढाणा जिल्हा नागरी व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था)प्रमुख व्याख्याते शैलेश कोतमिरे (मा अप्पर निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे),गणेश निमकर (प्रमुख व्याख्याते),सुरेद्रप्रसाद पांडे (सचिव नागरी व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था)संस्थेचे संचालक दिपक देशमाने,संतोष मापारी,स्वाती कन्हेर,मा. सकळकर,गिऱ्हे,मंगेश नसवाले आदी मान्यवर उपस्थितीत होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राधेश्यामजी चांडक यांनी केले.प्रमुख व्याख्याते शैलेश कोतमिरे सर यांनी सहकारी पतसंस्थांनी कशा पद्धतीने सेवाभाव जोपासत पतसंस्थेच्या व्यवसायात वृद्धी केली पाहिजे, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आर्थिक ताळेबंद, निधी व्यवस्थापनाविषयी अनेक उदाहरणातून त्यांनी मार्गदर्शन केले. सोलापूर जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँक तसेच सांगली जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँक याविषयी आर्थिक तोट्यातून आर्थिक दृष्ट्या सक्षम करत असताना केलेल्या विविध प्रयत्नातून "असाध्य ते साध्य" करता येऊ शकते याचे देखील सविस्तर कथन आपल्या व्याख्यानातून केले.यावेळी गणेश निमकर सर पुणे यांनी कर्ज व्यवस्थापन आणि एनपीए व्यवस्थापन आदी विषयावर शिबिरार्थींना मार्गदर्शन केले..यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील विविध पतसंस्थाचे संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्कृष्ट नियोजन या शिबिराचे झाले त्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक सुरज शर्माजी आणि जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे सर्व कर्मचारी, सहकारी यांनी सुंदर आयोजन केले.