तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या पथकाची अवैध रेती वाहतूक टिप्परवर कारवाई...!
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
संग्रामपूर तालुक्यात अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहितीवरून अवैध रेती वाहतुक करतांना 1 ब्रास असलेले टिप्परवर जस्तगाव फाट्यावर 16 जुलै रोजी सकाळी ८ वाजता तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या पथकाने केली आहे .प्राप्त माहितीनुसार , संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव फाट्याजवळ गोपाल श्रीराम वरणकार याच्या मालकीचे टिप्पर अशोक लिलॅन्ड कंपनीचे वाहन क्र एम एच २८ बी बी ८७६६ पाठलाग करून अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले.सदर टिप्पर चालक यास रॉयल्टी ,वाहतुक परवाना बाबत विचारना केली परंतु मिळून न आल्याने सदर टिप्पर मध्ये 1 ब्रॉस अवैध रेती मिळून आली तहसिलदार महसुल पथकाने पंचनामा केला व टिप्पर तामगाव पोस्टेच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई तहसिलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनात ग्राम महसूल अधिकारी अविनाश खरे , आकाश पाटील यांनी केली.