भरधाव कंटेनर पुलावरुन खाली..दुर्घटनेत चालक,वाहक गंभीर जखमी...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव-जळगाव रस्त्यावरील हॉटेल सातबारा जवळील पुलावरून कापसाच्या गाठीने भरलेले भरधाव वेगाने जळगाव च्या दिशेने येणारे कंटेनर पुलावरून खाली कोसळल्याची घटना दिनांक १७ जुलै रोजी दुपारच्या दरम्यान घडली. यामध्ये चालक व वाहक गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. कंटेनर क्रमांक आरजे १४ जीएन ०१८९ च्या चालकाने कंटेनर भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवत होता त्यामुळे वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या अपघातामध्ये गंभीर जखमी असलेल्यांची नावे कळू शकली नाहीत.या कंटेनर मध्ये अंदाजे ३० ते ३५ लाख रुपयांच्या कापसाच्या गाठी असून कंटेनर चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळाला जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रशांत झेंडगे, पोलीस नाईक इरफान शेख, पोहेकाँ गजानन मानकर यांनी घटनास्थळ गाठून संबंधित घटनेची माहिती घेत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.