नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेत सहकार विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांचे सुयश...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
जळगाव जामोद शहरातील सुप्रसिद्ध केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढविला आहे... शैक्षणिक सत्र 2024 25 मध्ये घेण्यात आलेल्या जव्हार नवोदय विद्यालय निवड परीक्षेत इयत्ता आठवी मध्ये शिकणारी शाळेचे विद्यार्थिनी कुमारी श्रेया रमेश आढाव हिने यश संपादन करून ती नवोदयच्या प्रवेशासाठी पात्र ठरली आहे... त्यासोबत याच वर्षी घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील हर्ष ऋषिकेश विप्रदास व आशुतोष दलाल हे विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत... दर्जेदार आधुनिक शिक्षणासोबतच स्पर्धात्मक परीक्षेसाठी सहकार विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहित केले जाते... शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीतून शाळेतील विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला, मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला, प्राचार्य विनायक उमाळे, पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे आणि मनीषा म्हसाळ चेन्नई अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत,