राष्ट्रीय सेवा योजना प्लास्टिक निर्मूलन अभियान रॅली संपन्न...


 
राष्ट्रीय सेवा योजना प्लास्टिक निर्मूलन अभियान रॅली संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

 त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव बाजार ता जळगाव जामोद च्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना युनिट तर्फे दिनांक 19 जुलै शनिवार रोजी प्लास्टिक निर्मूलन अभियान प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांना प्लास्टिकचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. त्यानंतर गावातून प्रभात फेरीच्या माध्यमातून  जागृती करण्यात आली. विविध घोषणेच्या द्वारे प्रबोधन करण्यात आले. राष्ट्रीय समाज योजना युनिटच्या  विद्यार्थ्यांनी यासाठी परिश्रम  घेतले. यामध्ये कु. नेहा वाकोडे,कु. तेजस्विनी लहासे, कु.अश्विनी गावंडे, कु साक्षी जाधव,कु. दिव्या पाखरे ,सौरभ जाधव, सुपेश  गावंडे, आनंद वानखडे यांनी विशेष पुढाकार घेतला.यावेळी प्राचार्य विद्या काटले, प्रा सुप्रिया इंगळे, प्रा माहेश्वरी वाघमारे,प्रा योगेश वारुकार, प्रा रवींद्र निमकर्डे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा शरद गावंडे उपस्थित होते.

Previous Post Next Post