कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त संतोष पांडुरंग भास्कर प्रगतीशिल शेतकरी पुरस्काराने सन्मानीत...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
हरित क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन कार्यक्रमात कृषी विभाग, जिल्हा परिषद, अकोला यांच्यावतीने युवा शेतकरी म्हणून अकोट तालुक्यातील राहणापुर येथिल आदिवासी शेतकरी संतोष पांडुरंग भास्कर यांना वरीष्ठ अधिकारी यांच्या हस्ते प्रगतिशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.बोलले जात आहे की संतोष यांनी आपल्या कठोर परिश्रमाने आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाने कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असल्याचे दिसून येत आहे.संतोष पांडुरंग भास्कर हे आकोट तालुक्यातील सातपुडा पर्वत यांच्या पायथ्याशी छोटे खेडे राहणापुर हे गाव असुन त्यांना शेती बद्दल चांगलेच अनुभव असल्याचे बोलले जात आहे.संतोष पांडुरंग भास्कर यांना १/७/२०२५ ला प्रगतिशील शेतकरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
