स्व.बापुमिया सिराजोद्दीन पटेल यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन...
जळगांव जामोद प्रतिनिधी....
पिंपळगाव काळे येथील बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष मा.ॲड.सलीमजी पटेल, सहसचिव श्री रब्बानी देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. कय्युमजी पटेल,तथा सिराजोद्दीन पटेल यांच्या मार्गदर्शनात दि 1जुलै 2025 रोजी संस्थेचे प्रेरणा स्थान स्व. बापूमिया सिराजोद्दीन पटेल गुरुजी उपाख्य भाऊसाहेब यांच्या जयंती निमित्त फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इ.12 वी. च्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ॲड. सलीमजी पटेल साहेब होते.तसेच मंचावरकार्यक्रमासाठी संचालिका सौ.यास्मिन तबस्सुम सलीम पटेल, संचालक सिराजोद्दीनभाई पटेल, सहसचिव रब्बानी देशमुख ,संचालिका सौ परवीन देशमुख कु.अनमगोहर सलीम पटेल,नांदुरा येथील गौरव पाटील,प्राचार्य डॉ.शेख फराह,पळशीचे उपसरपंच नीलेश भोपळे,राजूभाऊ पाटील,दरबारसिंग जाधव,प्रा. डॉ.मुदसिर अली इंजिनिअर काळे साहेब,हरिभाऊ उगले मुख्याध्यापक अजित तडवी डे कॉलेजचे प्राचार्य प्रा. शोएब सर,यांचीही कार्यक्रमासाठी उपस्थिती होती.कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. सलीमजी पटेल व उपस्थित मान्यवर यांचे शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून भाऊसाहेब बी.एस.पटेल गुरुजी ,हज्जन जैतुनबी बापूमिया पटेल,वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करण्यात आला.तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.यानंतर इ .12 वी मध्ये कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या कु. समृद्धी चिंचोलकर, वाणिज्य शाखेतून प्रथम आलेल्या कु. स्नेहा भोपळे,तसेच विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या कु.निकिता गवई, श्रेया मोरे,अमन भोपळे ,श्वेता वडोदकर , गणेश ढगे इ.सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी उपस्थित गौरव पाटील यांनी या कौटुंबिक सोहळ्यामुळे आपण भारावून गेलो असे सांगत सिराजोद्दीन बापूमिया पटेल यांच्या सत्यशोधक चळवळतील योगदान या बाबत माहिती दिली.सहसचिव रब्बानी देशमुख यांनी सुद्धा गुरुजींचे प्रेरणेने आपण संस्थेचा विकास करू शकलो असे सांगितले.आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मा.ॲड.सलीमजी पटेल यांनी विद्यार्थ्यांना बी.एस.पटेल गुरुजी उपाख्य भाऊसाहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत असे सांगितले.तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अधिकारी होऊन देशसेवा करावी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य मुकूंद इंगळे यांनी केले.तसेच महाविद्यालय परिसरात उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
