मोबाईल वर झालेली मैत्री पडली महागात,लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुली सोबत जबरदस्ती ने शरीरिक संबंध....


 
मोबाईल वर झालेली मैत्री पडली महागात,लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुली सोबत जबरदस्ती ने शरीरिक संबंध....

सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

अमरावती जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुली सोबत मोबाईलद्वारे मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून शेगाव येथील एका हॉटेलवर जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना दि. २१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता दरम्यान घडली असून पीडित मुलीच्या फिर्यादी वरून कासारखेड येथील युवका विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याबाबत सविस्तर हकीकत अशी की अचलपूर तालुक्यातील ऐका १७ वर्षीय अल्पवयीन मुली सोबत  अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यामधील कासारखेड येथील आरोपी नागेश देविदास तायडे वय १८ वर्ष याने पिढीचे सोबत मोबाईल फोन द्वारे मैत्री केली आणि दोघेही एकाच समाजातील असल्याने त्याने लग्न करण्याचे आश्वासन देऊन शेगाव येथील एका हॉटेलमध्ये दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जबरदस्ती  शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत  पिडीत मुलीने  परतवाडा ग्रामीण पोलीस स्टेशनला दिनांक १७ जुलैला तक्रार दिली असता घटनास्थळ  शेगाव असल्याने शहर पोलीस स्टेशन ला  वर्ग करण्यात आला त्यानुसार दिनांक १७ जुलै २०२५ रोजी   शेगाव पोलीसांनी आरोपी  नागेश देविदास तायडे याचे विरुद्ध  अप. नं ४२७/२०२५ कलम ६४, ६४ (२)(१) बी एन एस सह कलम ४,६ पोस्को अन्वये गुन्हे  दाखल करण्यात आले असून  पुढील तपास  गजानन सोनटक्के हे करीत आहे.

Previous Post Next Post