आदिवासी तडवी भिल समाजाचा जळगावात आक्रोश मोर्चा..३ हजाराहून अधिक आदिवासी बांधव मोर्चाला हजर...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करीत असताना जेवढे काही आदिवासी तडवी भिल समाजामधील लोकांनी धर्मांतर केलेले आहे अशा सर्व लोकांचे आदिवासींचे मिळत असणारे आरक्षण आरक्षण बंद करून त्यांना मिळणाऱ्या सर्व सवलती बंद करण्यात याव्या अशी मागणी विधानसभेमध्ये केली होती. आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केलेल्या या विधानाने संपूर्ण आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केलेल्या विधाना विरुद्ध एकत्र येत सर्व आदिवासी समाजातील महिला व पुरुषांनी हजारोंच्या संख्येने जळगाव जामोद व संग्रामपूर येथून येऊन उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केलेल्या विधानाचा निषेध करीत आदिवासी समाजातील तडवी भिल्ल यांचे आरक्षण कायम ठेवा या मागणीचे निवेदन राज्यपाल विधानसभा व विधान परिषद अध्यक्ष यांचे सह मुख्यमंत्री तसेच आदिवासी विभागाचे मंत्री यांना देण्यात आले. संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील तडवी भिल्ल समाजाच्या वतीने या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्च्याची सुरुवात जळगाव बायपास रस्त्याने करीत आदिवासी भिल्ल समाजाचे तीन हजाराहून जास्त महिला पुरुष युवक युवती व लहान बालके एकत्र येत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा धडकला या आक्रोश मोर्चामध्ये आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देण्यात आल्या. या मोर्चात कोणतीही गालबोट लागू नये याकरिता जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून मोर्चा शांततेत पार पाडला. यावेळी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचे गंभीर घट्टे, हुसेन पालकर, मुसा सुरत्ने, आफतर मोरे,सत्तार केदार, जालम केदार, अयुब तडवी, इमाम तडवी, साबीर केदार, तसलीम पालेकर, अरबाज सुरत्ने, कासम तडवी, मुन्शी सुरत्ने यांचे सह हजारोंच्या संख्येने आदिवासी तडवी भिल्ल समाजातील महिला व पुरुष उपस्थित होते.