तहसीलदार यांच्या कार्यलाया समोरच रमीचा डाव, कृषिमंत्री कोकाटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाचे अनोखे आंदोलन.
जळगाव जामोद प्रतिनिधी...
कृषिमंत्री माणिक कोकाटे यांचा राजीनामा घ्या - राष्ट्रवादीचे नेते प्रसेनजीत पाटिल यांची मागणी.विधानसभेचे पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले त्यामध्ये विधानभवन चालू असतांना कृषिमंत्री माणिक कोकाटे यांचा मोबाईल वर रमी खेळतांनाचा वीडियो वायरल झाला. राज्यात शेतकरी हवालदिल असतांना, पाऊस नाही त्यामुळे विवंचनेत आहे सोबतच हुमनी किड़ी सारख्याचा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सरकारने आश्वासन दिलेली शेतकरी कर्जमाफी केली जात नाही. हे शेतकर्याचे प्रश्न सोडून कृषिमंत्री माणिक कोकाटे विधानभवनात कामकाज चालू असतांना मोबाईल वर रमी खेळतात ही राज्यासाठी आणि या महायुती सरकार साठी शरमेची बाब आहे. कृषिमंत्री कोकाटे यांच्या या कृतिचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्ष जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने आज दिनांक 23/7/2025 रोजी जळगाव जामोद तहसील मध्ये तहसीलदार यांच्या कार्यालया समोर पत्ते खेळून निषेध व्यक्त करण्यात आला.कृषिमंत्री यांचा राजीनामा मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते प्रसेनजीत पाटिल यांनी केली. यावेळी प्रसेनजीत पाटिल, विश्वासराव भालेराव, प्रमोद सपकाळ, एम.डी. साबीर, ईरफान खान, शेख जावेद,एजाज देशमुख, विष्णु रोठे,हनुमंत देशमुख,महादेव भालतडक, सिद्धार्थ हेलोड़े,आशिष वायझोडे, दत्ता डिवरे,वामन गुड़ेकर,श्रीकृष्ण जाधव, अकील शाह, तुकाराम गटमने यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.