खामगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक संपन्न...नवनियुक्त जिल्हाप्रमुख बुलढाणा गजानन वाघ यांचा सत्कार...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
खामगाव येथे दिनांक २१ जुलै रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली.यावेळी शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी नवनियुक्त जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांना शुभेच्छा दिल्या व सत्कार केला शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी खामगाव तालुक्यातील विभाग प्रमुख,उपविभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख,शहर प्रमुख, उपशहर प्रमुख,संघटक समन्वयक,आजी-माजी पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी पदाधिकाऱ्यांशी संघटनात्मक बांधणी करण्यावर जोर द्या आव्हान केले जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी पदाधिकारी शिवसैनिकांना २७ जुलै पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खामगाव तालुक्यातील शहरातील साहेबांच्या वाढदिवसाची फलक आरोग्य शिबिर आपापल्या जिल्हा परिषद गणांमधील समारंभ कार्यक्रम शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप अशा विविध उपक्रम राबवा अश्या सुचना जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी केले तसेच खामगाव युवासेनेची तालुकाप्रमुख पदाची नियुक्ती यावेळी करण्यात आली माझी सहकारी युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील यांनी नियुक्ती केली,यावेळी खामगाव तालुक्याचे तालुकाप्रमुख श्रीराम खेलदार,विधानसभा संघटक विजय बोदडे , मा विधानसभा संघटक रवी महाले महिला आघाडी प्रमुख श्रृतीताई पतंगे,उर्मिलाताई ठाकरे युवासेना तालुकाप्रमुख,शहर प्रमुख ग्रामीण भागातील आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांचे सोबत जळगाव जा शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख उल्हास माहोदे, सहकारी युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल पाटील होते.