कृषी दिनी सुनगांवचे कृषीमित्र मोहनसिंह राजपुत विशेष पुरस्काराने सन्मानित...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे कृषी मित्र म्हणून काम करीत असलेले कर्तव्यदक्ष नागरिक तसेच पाणी फाउंडेशन मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून गाव पाणीदार करणारे जलयोध्ये मोहनसिंह राजपूत यांना कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने १ जुलै कृषी दिनी शेतकऱ्यांसाठी भरीव व कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना संदर्भात शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करून कृषी विभाग व शेतकरी यांच्यामधील दुवा म्हणून दर्जेदार कामगिरी केल्याबद्दल सुनगावचे कृषीमित्र मोहनसिंह राजपूत यांना सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्षा डॉक्टर स्वातीताई वाकेकर, माजी पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार पवन पाटील, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देवुन विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी तालुकाभरातील शेतकरी कृषी मित्र यांच्यासह कृषी विभाग जळगाव जामोद चे सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.
