बुलडाणा येथे आदिवासींच्या न्याय हक्कासाठी बैठक संपन्न!!आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार प्रकरणी घटनेचा निषेध व्यक्त केला,!!


 
बुलडाणा येथे आदिवासींच्या न्याय हक्कासाठी बैठक संपन्न!!आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार प्रकरणी घटनेचा निषेध व्यक्त केला,!!
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

बुलडाणा जिल्ह्यातील मोतला तालुक्यातील मोहेगाव,माळेगाव  येथील आदिवासीं समाजाच्या घरावर आक्रमण करण्याचे षडयंत्र प्रशनाने केले असून त्याचा प्रतिकार केला म्हणून वनविभाग तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी आदिवासी पुरुष, महीला, लहान मुले यांना मारहाण करून अश्लील शिवीगाळ करून उलट त्यांचावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे,त्या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद बुलडाणा जिल्हा च्या वतीने बुलडाणा येथे दिनाक 28/7/2025 रोजी बैठक आयोजत केली होती.बैठकीचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे हे होते.मोघे साहेब यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना सांगितले की समाजाचे पुनर्वसन करून त्यांना त्यांची जागा, शेती परत करून देण्याचे आश्वासन दिले.जल, जंगल, जमीन आदिवासींची आहे याला कोणी अडथळा निर्माण करत असेल तर त्यांना सोडले जाणार नाही असे स्पष्ट आदेश दिले तसेच प्रत्यक्ष गावात जाऊन आदिवासी बांधवांची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली त्यावेळी महीला आघाडी राज्य प्रमुख नंदणीताई टारपे,राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिचड वर्ग संघटने चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदिर,बुलडाणा जिल्हा अध्यक्ष सोपान सोळंके, गजाननभाऊ सोळंके,सुखदेराव डाबेराव, सचिन भाऊ पालकर, अंबादास भाऊ डाबेराव, भगवान भाऊ सोळंके, राजेश भाऊ टारपे, भास्करराव ठाकरे, विनोद डाबेराव, खरात दादा, अमर दादा वाघमारे, निलेश पवार, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Previous Post Next Post