● जळगाव जामोद येथे मागासवर्गीय महिला बचत गटांना कॅटरिंग साहित्याचे वितरण.....


 
● जळगाव जामोद येथे मागासवर्गीय महिला बचत गटांना कॅटरिंग साहित्याचे वितरण.....

जळगाव जामोद प्रतिनिधी.....

जिल्हा परिषद बुलढाणा व पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत जिल्हा परिषदच्या २०% शेष निधीच्या माध्यमातून दि 30 जुलै रोजी पंचायत समिती कार्यालय, जळगाव जामोद अंतर्गत मागासवर्गीय महिला बचत गटांना कॅटरिंग साहित्याचे वितरण आ डॉ.संजय कुटे यांचे हस्ते करण्यात आले.उद्देशित मागासवर्गीय महिला बचत गटांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॅटरिंग साहित्याचे वितरण हे एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे. महिलांनी बचत गटांनी आपला व्यवसाय उभा करावा, स्वयंपूर्ण व्हावे आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, या दृष्टीने हा उपक्रम अतिशय महत्वाचा ठरणार असल्याचे आ डाॅ संजय कुटे यांनी सांगितले.“समाजातील मागासवर्गीय महिलांना आत्मनिर्भर बनविणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. हा उपक्रम महिलांच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.” असा विश्वासही आ डॉ.संजय कुटे यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी  संदीप मोरे  यांच्यासह महिला बचत गटांच्या प्रतिनिधीं, पंचायत समितीचे कर्मचारी बांधव यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post