बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई गांजा आणि दारू तस्करास अटक; तीन लाखांचा मुद्दे माल जप्त...
बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी....
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी १९ जुलै रोजी दोन ठिकाणी छापे टाकले. या दरम्यान अमली पदार्थ आणि दारू तस्करीचा पर्दाफाश केला.मोताळा येथे केलेल्या कारवाईत २ लाख ९७ हजार ६०० रुपये किमतीचा १४ किलो ८८० ग्रॅम गांजा तर धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६१ हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोलीस अंमलदार चांद शेख, जगदेव टेकाळे, गणेश पाटील, विजय वारुळे, मंगेश सनगाळे, गजानन गोरले, चालक पोलीस अंमलदार समाधान टेकाळे यांच्या पथकाने मोताळा येथे काशिनाथ मोहन मोहिते ( रा. राजे संभाजी नगर, मोताळा) याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी त्याला अवैधरित्या गांजा विक्री करण्याच्या तयारीत असताना रंगेहात पकडले.
मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखेची कारवाई
यावेळी त्याच्याकडून १४ किलो ८८० ग्रॅम वजनाचा गांजा (किंमत २ लाख ९७ हजार रुपये) जप्त करण्यात आला. या प्रकरणी बोरखेडी पोलिसांत भारतीय न्याय संहिताचे कलम ८ (सी), २० (बी) (२) एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पुढील कारवाईसाठी बोराखेडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस अंमलदार रघुनाथ जाधव, एजाज खान, दिगंबर कपाटे, अजीज परसूवाले, विक्रांत इंगळे, चालक पोलीस अंमलदार शिवानंद हेलगे यांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाड टाकली. यावेळी आरोपीकडे १५ बॉक्स देशी-विदेशी दारूचा साठा (किंमत ६१ हजार ६० रुपये) आढळून आला. या प्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.