सुमीत रामकिसन खंडारे यांना भाऊ फाउंडेशन पँथर्स च्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर....


 
सुमीत रामकिसन खंडारे यांना भाऊ फाउंडेशन पँथर्स च्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण  पुरस्कार जाहीर....

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

भाऊ फाऊंडेशन पँथर्स महाराष्ट्र राज्य व शाकतोकान कराटे व क्रीडा मंडळ जालना, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार 2025" यांच्या  राज्यस्तरीय पुरस्कार "सोहळा चे  आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी त्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते .यामध्ये नुकतेच पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे कामगार नेते, सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार सुमीत रामकिसन खंडारे यांची राज्यस्तरीय  समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. असे पत्र या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भाऊ फाउंडेशन पँथर्स महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहे.  त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत,त्यांची निवड राज्यस्तरीय  समाजभूषण पुरस्कारसाठी करण्यात आली आहे. जालना येथे होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडून मुळे विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Previous Post Next Post