सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ४ जणांविरुद्ध पो.स्टे.ला गुन्हा दाखल...


 
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ४ जणांविरुद्ध पो.स्टे.ला गुन्हा दाखल...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

सोशल मीडियाद्वारे तसेच प्रसार माध्यमांवर शिवीगाळ करून बदनामी केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला चार जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक २६ जुलै रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव जामोद येथे  ठेकेदारीचा व्यवसाय करणारे गजानन जगदेवराव सरोदे राहणार पळसखेड हल्ली मुक्काम जळगाव जामोद वय ६३ यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली किशोर रौदळे रा.वरवट बकाल, विशाल विनोदराव बकाल (ऊर्फ ट्रिपल व्ही बकाल, योगेश कोल्हे,अजय हरिभाऊ पारस्कर यांनी मला प्रसार माध्यमाद्वारे शिवीगाळ, बदनामी तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या प्रकरणी तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून वरील चौघांविरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला अप क्र-३६४/२०२५ कलम २९६,३५६(२),३५१(२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नारायण सरकटे करीत आहेत.

Previous Post Next Post