पिंपळगाव काळे येथील नागरिकांचा स्मार्ट मीटरला विरोध...स्मार्ट मिटर काढा; नाहीतर आम्ही काढू...


 
पिंपळगाव काळे येथील नागरिकांचा स्मार्ट मीटरला विरोध...स्मार्ट मिटर काढा; नाहीतर आम्ही काढू....

मंगल काकडे/पिंपळगाव काळे...

जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे गावातील शेकडो नागरिकांना त्यांचे सुरळीत चालू असलेले पोस्टपेड मीटर काढून त्यांना स्मार्ट मीटर लावण्यात आले आहे. परंतु ज्यांनी स्मार्ट मीटर लावले त्यांना तीन पट चार पट मासिक लाईट बिल आलेले आहे.वारंवार तोंडी व लेखी तक्रारी संबंधित विभागाला देऊन सुद्धा आमच्या समस्यांचे निवारण होत नाही आम्हाला आलेले जास्त प्रमाणामध्ये आलेले लाईट बिल  तात्काळ कमी करण्यात यावे यासंदर्भात यापूर्वी पिंपळगाव काळे उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडे सुद्धा तोंडी व लेखी सूचना दिल्या आहेत.परंतु त्यावर त्यांनी कोणतीही ठोस भूमिका अथवा कारवाई केली नाही. यापुढेही दर महिन्याला सातत्याने आम्हाला असे अवाजवी दुप्पट तिप्पट बिल येतील तर ते बिल आम्ही कुठून भरायचे तेवढी आमची आर्थिक परिस्थिती नसून आम्ही मोल मजुरी करून जीवन जगणारे नागरिक आहोत आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेले वीज बिल भरणे अशक्य आहे ते आम्ही कदापिही भरणार नाही. तुमच्या या सक्तीला आम्ही बळी पडणार नाही तुमच्या फायद्यासाठी लावलेले हे स्मार्ट मीटर आमचे जीव घेणारे आहेत हे नाकारता येत नाही.आम्हाला आलेले वीज बिल हे मागील महिन्यापेक्षा जास्त प्रतीने आलेले आहेत  ते आम्हाला सुरळीत करून देण्यात यावे किंवा आपण लावलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढून आमचे आधी असलेले पोस्टपेडमीटर लावण्यात यावे.यावर महावितरण ने दहा दिवसात वरील दोन्ही पैकी कोणतेही कारवाई न केल्यास येत्या दहा दिवसानंतर पिंपळगाव काळे येथील आमच्या घरी लावलेले स्मार्ट मीटर आम्ही काढून महावितरण कंपनी कार्यालय पिंपळगाव काळे येथे आणून देणार आहोत यासंदर्भात  लेखी निवेदन व अल्टिमेटम कनिष्ठ अभियंता पिंपळगाव काळे यांना देण्यात आले आहे,निवेदन देते वेळी सारथी फाउंडेशन अध्यक्ष प्रकाश भिसे, गोपाल ढगे, संतोष शेलकर, ओम वरनकार, रविन्द्र राऊत, ईश्वर राऊत आदी नागरिक उपस्थित होते.!

Previous Post Next Post