वडनेर भोलजी येथील महीला पत्रकार तथा समाजसेविका उमाताई बोचरे यांची छेडखानी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल...


 
वडनेर भोलजी येथील महीला पत्रकार तथा समाजसेविका उमाताई बोचरे यांची छेडखानी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी.... 

वडनेर भोलजी (ता. नांदुरा) येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये स्थानिक समाजसेविका उमाताई गोपाल बोचरे यांचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सदर प्रकरणात अजमतबेग उर्फ बाबामिर्झा अकबरबेग मिर्झा (वय 37), रा. वडनेर भोलजी याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.ही घटना 1 मे 2025 ते 3 जुलै 2025 दरम्यान घडल्याचे पोलिस हकीकतीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी उमाताई बोचरे या समाजसेवेच्या कार्यासाठी गावात फिरत असताना आरोपीने त्यांचा छुप्या पद्धतीने पाठलाग केला. तसेच लज्जा उत्पन्न होईल असे इशारे, हातवारे करून त्रास दिला आणि नको त्या प्रकारे जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.त्यातच जर फिर्यादीने आरोपीसोबत काम न केल्यास तिची खोटी बदनामी करणारी बातमी प्रसारित करणार असल्याची धमकी दिली गेली. यावरून दि. ३ जुलै २०२५ रोजी "दैनिक जागृत मालक" या स्थानिक वृत्तपत्रात फिर्यादीची बदनामी होईल असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला, असेही फिर्यादीत नमूद आहे.ही तक्रार पोलीस कॉन्स्टेबल शकील तडवी (ब.नं. 1865) यांनी ओपी चौकी वडनेर भोलजी येथे आणून सादर केली. त्यानंतर पोलीस कर्मचारी सोळंके व नं. 288 यांनी पुढील प्रक्रिया करत गुन्हा क्रमांक 367/2025, भारतीय न्यायसंहितेतील कलम 78(2), 79, 353(2)(2), 351(2)(3) BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस नाईक चिखलकर (ब.नं. 946) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.या प्रकरणामुळे वडनेर भोलजी परिसरात खळबळ उडाली असून,वृत्त लिहेपर्यंत आरोपीला अटक किंवा पोलिसात बोलवणे सुद्धा झाले नसल्याचे समजते.पोलीस आरोपीला अभय देत  आहे असा समज येथील महिला वर्गात निर्माण झाला असल्यामुळे अशा या घटनेमुळे  वडनेर भोलजी येथील महिलांमध्ये महिला तरुणी मध्ये भीतीचे वातावरण दिसत असून पोलिसांनी त्वरित अशा आरोपीला गजाआड करावे अशीही मागणी केल्या जात असल्याचे वृत्त आहे.समाजसेविकेवर झालेल्या मानसिक छळाविरुद्ध कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Previous Post Next Post