उर्दू शाळेच्या पटांगणात साचते पाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर.. शाळेतील समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन...

उर्दू शाळेच्या पटांगणात साचते पाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर.. शाळेतील समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

संग्रामपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या पटांगणात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तसेच गावातील नाल्यांचे पाणी साचत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवित असो आरोग्यास धोका निर्माण झाला असून यासह शाळेची इमारत फार पुरातन असल्यामुळे शाळेची इमारत शिकस्त झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास हानी होऊ शकते तसेच उर्दू शाळेमध्ये विद्यार्थ्यांकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध नाही त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष एमडी साबीर अल्पसंख्यांक विभाग तसेच शेख हमीद तालुका अध्यक्ष मुस्लिम सेवा संघ यांनी गटशिक्षणाधिकारी संग्रामपूर निवेदन देऊन त्वरित शाळेतील समस्या निकाली काढण्याची मागणी केली आहे यावेळी साबीर खान, पठाणशिक साबिर नगरसेवक, शिक्षण समिती अध्यक्ष हुसेन खाँ, खालीद भाई, सिद्धीक कुरेशी, मोहम्मद आरिफ, शेख जुनेद, अखिल शेख मुनीर, शेख रशीद शेख हबीब, शोएब भाई यांच्यासह बहुसंख्य मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते.

Previous Post Next Post