शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम संपन्न...


 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक आज दिनांक २७ जुलै रोजी जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाभर विविध समाजोपयोगी उपक्रम व कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामध्ये जळगाव जामोद येथील सुनगाव रोड स्थित निळकंठेश्वर मंदिरामध्ये महादेवाची पूजा अर्चना करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दीर्घायुष्याच्या मंगल कामना केल्या तसेच ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज शाळा क्रमांक ३ येथे वृक्षारोपण करण्यात आले, जळगाव शहरातील गोरगरीब नागरिकांना कपड्यांचे वाटप करण्यात आले, ईश्वर शिवभजन केंद्रामध्ये निशुल्क भोजन देण्यात आले यासारखे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ, तालुकाप्रमुख संतोष दांडगे, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मुस्ताक भाईजान, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, शहर प्रमुख रमेश ताडे, उपशहरप्रमुख चाँद कुरेशी, विशाल पाटील, संकेत रहाटे,कैलास राजपूत, अनिस शेख, अताऊल्ला खान,संतोष डब्बे, गजानन मांडेकर, सुधीर पारवे, सुनील दुरतकार, सुभाष माने, तसलीम पठाण, शेख मुन्ना, महादेव इंगळे,माणिकराव वाघ, सय्यद रहीम, विजयसिंह सोळंके, रामचंद्र वारूळकर, कैलास बघे, प्रमोद रोजतकार, प्रभाकर वहिदकर, हरिदास टापरे, संजय मेहेंगे, संजय दंडे, शेख शरीफ यांचे सह तालुका भरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post