अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे १ ऑगस्ट पासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यभरात विविध उपक्रम...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने संघटनेचे केंद्रीय , महाराष्ट्र राज्य तथा जिल्ह्यातील, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने राज्यभरात १ ऑगस्ट ऑगस्ट पासून १५ पर्यंत ऑगस्ट पर्यंत (पधंरवाडा) विविध उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.याच उपक्रमाचे नियोजनातून संघटनेने १ ला टप्पा मध्ये जुन , जुलै मध्ये केंद्रीय संपर्कप्रमुख- प्रा. रवींद्र मेंढे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष - कैलासबापू देशमुख , केंद्रीय कार्यालय प्रमुख -बाबाराव खडसे केंद्रीय ह्यांच्या सह प्रदेशातील पदाधिकार्याचे वाढदिवसानिमित्त राज्यभरात वृक्षारोपण व विविध उपक्रम राबविलेले आहे.पत्रकारांनी जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवावे असे पत्रकार संघाने धोरण ठरविल्यामुळे महाराष्ट्रतील सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांनी जिल्हा,तालुका बैठक घेऊन आपल्या जिल्ह्यांतील कार्यकारिणी, नुतनीकरण, व जिल्हा,तालुका स्तरावर वृक्षारोपण, रोगनिदान शिबिर, पत्रकार मेळावा, शालेय साहित्य वाटप आपल्या जिल्हा, तालुका स्तरावर करावे असे ठरविण्यात आलेले आहे.३ ऑगस्टला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांचा वाढदिवस असल्यामुळे या दिवशी पत्रकार सहकारी पतसंस्था शिरजगांव कसबा येथे दुपारी २ वाजता पत्रकार संवाद मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे.वरील कार्यक्रमात ,उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांचा कार्य गौरव सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील पत्रकार व केंद्रीय , प्रदेश तथा महिला मंच प्रदेश कार्यकारिणी , हजर राहाणे अनिवार्य आहे.१५ ऑगस्टला संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफखान यासीनखान पठाण यांचा वाढदिवस असल्यामुळे पंधरवडा उपक्रमाचा समारोप यानंतर होणार आहे. त्यामध्ये उत्कृष्ट कार्य , जिल्हा बांधणी केलेल्या जिल्हा अध्यक्ष व पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. संघटनेच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात वरील प्रमाणे कार्यक्रम राबवावे. व तसा अहवाल केंद्रीय कार्यकारणीला पाठवावा. असे संघटनेने राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना आवाहन केले असल्याचे संघटनेचे सुरेश सवळे - केंद्रीय महासचिव ,अशोक पवार केंद्रीय सचिव - राजेंद्र भुरे, केंद्रीय उपाध्यक्ष ,प्रदिप जोशी -केंद्रीय उपाध्यक्ष , माणिकराव ठाकरे - केंद्रीय सदस्य,अंबादास सिनकर, अभिमन्यू भगत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे , गोपाल सरनायक प्रदेश - सचिव,सुरेशराव ढवळे - प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संघटक मनोज कमेट,सुरज यादव विदर्भ आरोग्य समिती अध्यक्ष, अरूणभाऊ कुलथे - प्रदेश सल्लागार, जगदीश बुलबुल - मराठवाडा विभागीय अध्यक्ष, प्रियंका केदार - महिला मंच विदर्भ कार्याध्यक्ष, मंजुषा सागर - महिला मंच प्रदेश अध्यक्षा, कांचन मुरके - महिला मंच - प्रदेश सरचिटणीस , पायल बुलबुल - संभाजी नगर- महिला मंच जिल्हा अध्यक्षा प्रसिद्ध प्रमुख -सागर सवळे, शहजाद खान , नितीन पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.