मुख्यकार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांची मेळघाटातील एकताई,हतरु,खुटीदा, हिल्डा गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय,आरोग्य केंद्रांना भेट, भेटी दरम्यान गैरहजर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश...


 
मुख्यकार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांची मेळघाटातील एकताई,हतरु,खुटीदा, हिल्डा गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय,आरोग्य केंद्रांना भेट, भेटी दरम्यान गैरहजर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात येत असलेले एकताई,खुटीदा,हिल्डा,हतरु गावांना  कर्तव्यनिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी भेट दिली.भेटी दरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्या.एकताई गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता शाळेत एकही शिक्षक हजर नव्हते.शाळेतील शिक्षक गैरहजर होते.शाळेतील शासकीय दस्तावेज सापडले नाही.शोकांतिका म्हणजे वर्ग सातवीच्या मुलींना दोन अक्षरी साधे इंग्रजी शब्द सुद्धा वाचता येत नव्हते.शाळेतील मुलांची संख्याही खुप कमी होती.शाळेतील मुलं-मुलींना मेनूनुसार शालेय  पोषण आहार दिले जात नाही.शालेय पोषण आहार  साहित्य सुद्धा कालबाह्य आढळले.कालबाह्य  वस्तूमध्ये कांदा-लसूण पेस्ट,हळद जून २०२५ मध्ये कालबाह्य झाले होते.शाळेतील मुलांना शौचालायची व्यवथा नाही.गावकऱ्यांनी तक्रार केली की,शिक्षक रोज शाळेत येत नाही.व मुलांना बरोबर शिकवत  नाही.शिक्षकांच्या निष्काळजीपणा मुळे विदयार्थी वर्गाची अशी अवस्था झाली आहे.कर्तव्यनिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या भेटी दरम्यान एकताई,हतरु,खुटीदा, हिल्डा या भागातील  कामचोर,दांडीबाहाद्दर कर्मचारी यांची पोल खोल झाली आहे. येथील गैरहजर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे.शिक्षकांचे असे वर्तन बरोबर नाही.असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आले.मेळघाटात काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री यांनी दौरा केला होता.दौऱ्यादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र हतरु येथे भेट दिली होती. भेटी दरम्यान येथे सुद्धा कालबाह्य औषधी सापडल्या होत्या.यामुळे हतरु येथील चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.आज तोच प्रकार जिल्हा परिषद शाळा एकताई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटी दरम्यान समोर आला. स्थानिक नागरिकांची मागणी आहे की,अश्या कामचोर व दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर अंकुश लावण्यात यावा.महापात्र यांच्या अचानक दौऱ्यामुळे ग्रामस्तरावरील प्रसाशन सजग झाले असून,भविष्यात अश्या प्रकारच्या दौऱ्याची पुनरावृत्ती होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र यांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे सर्वांचे धाबे दाणाणले आहे.

Previous Post Next Post