लक्ष्मण हाके विरोधात गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी काँग्रेसचे मागणी...स्वतःला ओबीसीचा नेता म्हणून घेणारा ओबीसीं ची दिशाभूल करीत आहे-मो. बदरुज्जमा...
सय्यद शकिल/अकोट...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यावर अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाके याच्याविरुद्ध गुन्हे नोंद करण्यासाठी अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुज्जमा यांच्या नेतृत्वाखाली व असंख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांना निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे राज्याच्या संविधानिक पदावर विराजमान असताना व त्यांच्याकडे अर्थ खात्याचा कारभार असताना त्यांच्या बाबतीत अर्वाच्य भाषेचा वापर करून अपप्रचार पसरविणारा लक्ष्मण हाके हा स्वतःचे राजकीय अस्तित्व स्थापित करीत आहे. अजित दादा पवार यांनी ओबीसी विद्यार्थ्यांच्या फेलोशिप देण्यामध्ये जातीयवाद केल्याची अफवा ,गैरसमज पसरवीत आहे. लक्ष्मण हाके याला प्रशासकीय क्षेत्रातील कुठलाही ठोस अनुभव नसताना महाज्योती संस्थेला अजितदादांनी निधी दिला नसल्याची खोटी माहिती समाजामध्ये पसरवित आहे व अजित दादांचा अपमान करीत आहे.माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये अजित दादांचे संपूर्ण पॅनल विजयी झाले त्याबद्दल लक्ष्मण हाके यांनी अजितदादा यांनी मुख्यमंत्री पदाचा व अर्थमंत्री पदाचा राजीनामा देऊन चेअरमन पदाची निवडणूक लढवून दाखवायला पाहिजे होते असे बेताल वक्तव्य केले .स्वतःला प्रसिद्धी मिळावी या हेतूने लक्ष्मण हाके हपापलेला आहे.अजित दादा पवार यांच्यावर अर्वाच्य व अपशब्दात वाच्यता करणाऱ्या हाके च्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व महाराष्ट्रभरातील पदाधिकाऱ्याकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुज्जमा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांना निवेदन देतेवेळी अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मदन भरगड, माजी महापौर,प्रतिभाताई अवचार माजी जिल्हा परिषद सदस्य,काशीराम साबळे माजी जिल्हा परिषद सदस्य,संध्याताई वाघोळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, अमोल काळणे युवक जिल्हाध्यक्ष,रूपालीताई वाकोडे महिला जिल्हाध्यक्ष, प्रकाश खाडे सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष, सुषमा राठोड, विनोद कोगदे सेवादल जिल्हाध्यक्ष, उमेर अदनान विद्यार्थी जिल्हाध्यक्ष, रिजवान बाबा,जगदीश मारोडकर, हरिभाऊ वाघोडे, प्रभाकरराव अवचार, अनिल मालगे, गजानन म्हैसने, सिद्धार्थ तायडे, सर्वर बेग, किशोर तेलगोटे, अमोल लोकरे, यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले...