नेक्स्ट लेव्हल मॉलमधील स्पॉ सेंटरवर पोलिसांची धाड ,१ लाख १४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी गजाआड...अमरावती गुन्हे शाखा युनिट क्र.२पोलीस पथकाची कामगिरी...


 
नेक्स्ट लेव्हल मॉलमधील स्पॉ सेंटरवर पोलिसांची धाड ,१ लाख १४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी गजाआड...अमरावती गुन्हे शाखा युनिट क्र.२पोलीस पथकाची कामगिरी...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसस्टेशन हद्दीतील नेक्स्ट लेव्हल मॉलमधील स्पॉ सेंटरवर धाड टाकून १ लाख १४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीला गजाआड केले आहे.गर्ल्स हायस्कूल चौकात असलेल्या नेक्स्ट लेव्हल मॉलमध्ये पहिल्या मजल्यावर स्पॉ ९९ नावाचे मसाज सेंटरमधून मसाज थेरपी करण्याच्या नावाखाली अवैधरित्या बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुन्हेशाखा युनिट क्र. २ ने नेक्स्ट लेव्हल मॉलवर धाड टाकून आरोपी गोपी निरजसिंग भंवरसिंग पंड्या (३५) रा. दस्तूरनगर चैतन्य कॉलनी याला ताब्यात घेतले. या स्पॉ सेंटरमधून आक्षेपार्ह वस्तू, मोबाईल तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख १४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपी गोपी पंड्या यास या वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या मालकाचे नाव विचारले असता त्याने स्पॉ सेंटरचे मालक राकेश रावल रा. जावरा, जि. रतलाम मध्यप्रदेश असे सांगितले. तर सदर दुकानाचा मालक अभिजित दिलीप लोखंडे (३८) रा. जुनी वस्ती, रहाटगाव, शिवाजी नगर असल्याचे त्याने सांगितले.दोन्ही आरोपीचा शोध घेतला असता ते मिळाले नाही. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे आरोपींवर गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट क्र. २ ने पुढील कारवाई करिता प्रकरण गाडगेनगर पोलिसांकडे दिले आहे.

Previous Post Next Post