चालला हरी नामाचा गजर ।।
जळगाव नगरित अवतरली पंढरी...!!!
माऊली.. माऊली... माउली ... च्या गजरात निघाली सातपुड्याची वारी...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
विधिवत पूजन झाल्यानंतर स्थानिक तहसील ऑफिस,दूर्गा चौक, चौभारा, भाजी बाजार येथे रिंगण सोहळा पार पडला. रिंगण सोहळा हा डोळ्याचे पारणे फेडणारा होता.यावेळी चिमुकले टाळ मृदुंगासह विठू माऊलीच्या रूपात जयघोष करीत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत असो वा विठुरायाचे गीत असो वा भारुड खूप छान प्रकारे याचे प्रात्यक्षिक केले व आनंद लुटला. यावेळी अश्वावर आसनस्थ झालेला विठुराया रिंगन सोहळ्याला प्रदक्षिणा घालताना जनु पंढरी अवतरली आणि पंढरीचा स्वरूप या जळगाव नगरीला प्राप्त झालं असे मनोहरी दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते.पालखी मार्गस्थ होत असताना काँग्रेस शहराध्यक्ष अर्जुन भाऊ घोलप, तुकाराम काळपांडे, रमेश ताडे,श्रीकृष्ण केदार ,समाधान दामधर, मनोज राठी ,जयेश पलन, पत्रकार राजु वाढे, राजेश बाठे यांनी पण विधिवत पांडुरंगाचे पूजन केल.यावेळी चिमुकल्यांची वेशभूषा तसेच टाळ मृदुंगासह जयघोष करणारी गिते, त्यांनी म्हटलेले अभंग हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.भाविकांनी कोणी पाण्याची तर कोणी चॉकलेटची तर कोणी फराळाची व्यवस्था केली होती. तर जागोजागी विठु माऊलीच पूजन करत दर्शन घेत होते.सरते शेवटी राठी जिनिंग मध्ये चिमुकल्यांना फराळ देऊन चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले. प्राचार्य संतोष बकाल,निकडे सर व त्यांच्या सर्व टीमने या ठिकाणी अपार मेहनत घेतली.यावेळी सर्व प्राध्यापक वृंद सातपुडा कॉन्वेंट यांचे सहकार्य लाभले.