आमदार डाॅ संजय कुटे थेट पोहोचले शेतकर्यांच्या बांधावर... अधिकाऱ्यांना दिले पंचनामाचे आदेश...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
शेगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना आ डॉ.संजय कुटे यांनी भेट दिली. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची बांधावर जात पाहनी केली. अतिवृष्टीने शेतकरी राजाचं प्रचंड नुकसान केलं आहे. मेहनतीचे पीक, घामाचे स्वप्न… क्षणात वाहून गेलं.हा केवळ शेतकऱ्यांचा नाही, तर आपल्या सर्वांचा दु:खद प्रसंग आहे.झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केले असून उर्वरित पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.शासन तुमच्या पाठीशी ठाम उभं आहे.बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे आणि सुरू राहील,अशी ग्वाही दिली.यावेळी तहसीलदार दीपक बाजड, कृषी अधिकारी यांचेसह शेतकरी उपस्थित होते.