कर्जमुक्तीसाठी शिवसेना उबाठा महिला आघाडी सरसावली..ईसोलीत कर्जमाफीसाठी हजारो शेतकऱ्यांचे अर्ज घेतले भरुन...



 
कर्जमुक्तीसाठी शिवसेना उबाठा महिला आघाडी सरसावली..ईसोलीत कर्जमाफीसाठी हजारो शेतकऱ्यांचे अर्ज घेतले भरुन...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु असे फसवे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करीत शिवसेना उबाठा चिखली तालुका महिला आघाडीच्यावतीने २७ जुलै रोजी ईसोली येथे हजारो शेतकऱ्यांकडून कर्जमुक्तीचे अर्ज भरुन घेतले. तसेच शिवसेना शाखेचे उदघाटन करण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा समन्वयक तथा निवडणूक प्रमुख संदीपदादा शेळके यांच्या मार्गदर्शनात भाजप सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा लढा उभा करून कर्जमुक्तीसाठी शेकडो अर्ज भरून घेण्यात आले. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी चिखली उप तालुकाप्रमूख सुभाष आटोळे,  माजी सरपंच दामूअण्णा येवले, चिखली तालुका संघटिका एड रूपालीताई चौधरी, चिखली तालुकाप्रमुख महिला आघाडी  अनिताताई येवले, विठोबा तात्या गीते, सिताराम येवले, भीमराव गिरगुणे, सुनील शुक्ला, शहीदभाई, शेख इरफान, विठ्ठल जाधव,  तंटामुक्ती अध्यक्ष गजानन येवले, नवनियुक्त शाखाप्रमुख दादाराव पवार, उपशाखाप्रमुख श्रीकृष्ण पानसंबळ, युवा शाखाप्रमुख संदीप वाडेकर, युवा उपशाखाप्रमुख आकाश बांगर, युवा उपशाखाप्रमुख प्रभाकर येवले यांच्यासह शिवसैनिक व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचलन गोविंद येवले यांनी केले.

Previous Post Next Post