जळगाव जामोद तालुक्यामध्ये कृषी दिन उत्साहात संपन्न. शेतकऱ्यांना केले शेतीत पिकाविषयी मार्गदर्शन...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
आमदार डॉक्टर संजयजी कुटे यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र शासनाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जळगाव जामोद ,तसेच कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद व ड्रीप डीलर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक एक जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा थोर कृषि तज्ञ , हरित क्रांतीचे प्रणेते,कै वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथे कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राच्या कोषाध्यक्ष तथा महासिद्ध अर्बनच्या अध्यक्ष स्वातीताई वाकेकर या होत्या, विशेष उपस्थितीमध्ये शैलेश काळे उपविभागीय अधिकारी,जळगाव जामोद , पवन पाटील तहसीलदार जळगाव जामोद, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख श्री डॉक्टर जाधव साहेब, त्याप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र बदनापूर ,जिल्हा जालना येथील शास्त्रज्ञ डॉक्टर दिपक कचवे माजी पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे हे आवर्जून उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद चे उमाळे सर आणि दाते सर आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असे जळगाव जामोद तालुक्याचे नवनियुक्त तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव हे व्यासपीठावरती उपस्थित होते, सुरुवातीला कै, वसंतराव नाईक आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, कार्यक्रमांमध्ये कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या दहा शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र आणि फळ पिकांची रोपे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले,सदर कार्यक्रमाला जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी संदेशाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि येणारा हंगाम हा शेतकऱ्यांसाठी भरघोस उत्पादन देणारा आणि आर्थिक भरभराट असणारा असावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली, तसेच येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी नवनवीन प्रकल्पांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी त्यांच्या संदेशांमध्ये म्हटले, सदर कार्यक्रमांमध्ये शैलेश काळे उपविभागीय अधिकारी, साहेबांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपण स्वतः शेतकरी व कृषी पदवीधर असून शेतकऱ्यांनी येत्या काळामध्ये आधुनिकतेकडे वळण्याचे त्यांनी सांगितले, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्वातीताई वाकेकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व शेतकरी ,अधिकारी व कर्मचारी दिनाच्या शुभेच्छा दिल्या , भविष्यामध्ये शेती क्षेत्रामध्ये घडणाऱ्या नवीन बदलांबाबत , प्रयोगांबाबत शेतकऱ्यांनी चिकित्सक राहण्याचे सांगितले आणि विशेष करून जळगाव, संग्रामपूर तालुक्यांमध्ये फळबाग निर्यातीला कसे प्रोत्साहन देता येईल याबाबत मार्गदर्शन केले, तसेच कृषी विज्ञान केंद्र सदैव शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असून सर्व शेतकऱ्यांनी उपलब्ध सोयीसुविधांचा लाभ घेण्याबाबत त्यांनी सुतोवाच केले, एक जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यामध्ये असलेल्या संत्रा पिकावर ती खास मार्गदर्शन करण्यासाठी बदनापूर, कृषी विज्ञान केंद्र, शास्त्रज्ञ डॉक्टर दीपक कचवे हे आवर्जून मार्गदर्शनासाठी उपस्थित होते, त्यांनी मार्गदर्शनामध्ये संत्रा पिकामध्ये येणाऱ्या अडचणी, संत्रा पिक लागवडीपासून ते काढणीपर्यंत अगदी सूक्ष्मती सूक्ष्म नियोजन शेतकऱ्यांनी कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले ,अलीकडच्या दोन-तीन वर्षांमध्ये हवामानातील बदलामुळे संत्रा फळबागेला बहार नियोजन करताना जो शेतकऱ्यांना त्रास होत आहे व संत्रा फळगळ या दोन मुद्द्यांवर ती त्यांनी प्रकर्षाने मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून आला त्यांच्या संभाषणानंतर उपस्थित शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्याबाबत उपाय सुद्धा डॉ,कचवे यांनी सुचविले. तालुक्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये केळी पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहेत केळी पिक लागवडीचे व्यवस्थापनावरती कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद चे शास्त्रज्ञ शशांक दाते यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले ,केळी पीक लागवडी मधील बारकावे व भविष्यामधील घ्यायची काळजी याबाबत सविस्तर माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व तसेच वेगवेगळ्या शेती पद्धतीचे मॉडेल आपल्या सादरीकरणांमधून उपस्थित शेतकऱ्यांना दाखवले, आधी केले मगच सांगितले ,या युक्तीप्रमाणे त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये राबविलेल्या प्रयोगाची शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच सर्व शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संपर्कात राहून बांधांवरती बांबू लागवड ,मोहगनी लागवड ,तसेच इतरही योजनांबाबत सहभाग नोंदविण्याचे तालुक्यामधील शेतकऱ्यांना आजच्या या कृषी दिनी आवाहन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रस्ताविक श्रीकृष्ण शिंदे ,उप कृषी अधिकारी जळगाव जामोद यांनी केले, तर कु,उरकडे मॅडम यांनी एक जुलै या दिवसाचे महत्त्व आणि कै, वसंतराव नाईक यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, आत्मा ए टी एम राऊत, परेश निवाने तथा सर्व अधिकारी कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच कार्यक्रमाच्या सरते शेवटी १ जुलै ते ७ जुलै शतकोटी वृक्ष लागवडीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने व उपस्थित सर्वांनी वृक्ष लागवडीचा संकल्प केला...
