बी एस पटेल गुरुजी उपाख्य भाऊसाहेब यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे बी एस पटेल गुरुजी उपाख्य भाऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयामध्ये भाऊसाहेब मातोश्री हज्जन जैतून बी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून व्यायाम शाळेचे, स्पर्धा परीक्षेचे उद्घाटन व वृक्षारोपण करण्यात आले.भाऊसाहेबांचे स्वप्न होते की, असं महाविद्यालय असलं पाहिजे की, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्यांच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीमजी पटेल यांनी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक व्यायाम शाळेची उभारणी केली आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तकीय शिक्षणासोबतच शारीरिक शिक्षणाचे धडे घेऊन दररोज व्यायाम केला पाहिजेत. महाविद्यालयीन व्यायाम शाळेमध्ये मुलींना सुद्धा व्यायाम करण्यास प्रेरित करावे, अशा सूचना महिला प्राध्यापकांना केल्या आहेत. शरीर सुदृढ तर मन सुदृढ, "शरीर माध्यम खलु धर्म साधनम्" असे उद्गार त्यांनी काढले.सोबतच महाविद्यालयामध्ये विविध जातींचे रोपटे आणून वृक्षारोपण करण्यात आले. भाऊ साहेबांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातून व कला शाखेतून सर्वप्रथम येणारी समृद्धी चिंचोलकर, वाणिज्य शाखेतून स्नेहा भोपळे विज्ञान शाखेतून निकिता गवई तसेच विविध विषयांमध्ये प्रथम आलेले श्रेया मोरे अमन भोपळे श्वेता वडोदकर गणेश ढगे आदी गुणवंत विद्यार्थी होते.बी एस पटेल हायस्कूलमध्ये सेमी इंग्रजी इयत्ता आठवी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा 1000 रुपये स्कॉलरशिप वर्ग दहावी पास होईपर्यंत मिळणार आहे. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांसाठी तीनशे रुपये प्रत्येक महिन्याला स्कॉलरशिप मिळणार आहे. अशा प्रकारची आर्थिक मदत देण्याचा व या विद्यार्थ्यांना ये. आय. च्या माध्यमातून शिक्षण देऊन भविष्यात पुढे अधिकारी, डॉक्टर इंजिनियर बनविण्याचा संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीमजी पटेल यांनी केला.या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल सहसचिव रब्बानी देशमुख संचालिका यास्मिन तबस्सुम, परविन देशमुख, संचालक सिराजोद्दीन भाई पटेल, अनम पटेल, अभियंता सतीश काळे गौरव पाटील हरिभाऊ उगले बालगजानन अवचार उपसरपंच निलेश भाऊ भोपळे दरबार सिंग जाधव प्रा मुदस्सीर अली प्राचार्य शेख फराह मुख्याध्यापक अजित तडवी डे कॉलेजचे प्राचार्य मोहम्मद शोयब शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य एम बी इंगळे यांनी केले.
