स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तेल्हारा तालुकाध्यक्षपदी प्रदीप पाटील यांची निवड...


स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तेल्हारा तालुकाध्यक्षपदी प्रदीप पाटील यांची निवड...

प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी....

हिवरखेड येथील रास्त भाव दुकानदार व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील यांची तालुका तेल्हारा अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार हिवरखेड येथील माजी सरपंच बाळासाहेब भोपळे, संतोष शर्मा, शहजाद खान,जिया खा,अर्जुन खिरोडकर यांनी सत्कार घेतला तसेच ,तेल्हारा तालुका स्वस्त  धान्य दुकानदार संघटनेची बैठक नुकतीच तेल्हारा येथील साई मंदिर संस्थान परिसरातील सभागृहात येथे पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नुसरत खान पठाण तर सूचक पंकज बाजारे आणि अनुमोदक राजेश खारोडे जिल्हा उपाध्यक्ष विदर्भ यांची उपस्थिती होती.यावेळी तेल्हारा तालुक्याध्यक्ष या पदाच्या निवडीचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला.या ठरावात  प्रदीप पाटील यांची अविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी तेल्हारा तालुका संघटनेची कार्यकारणी गठीत करण्यात आली या तालुका उपाध्यक्ष पदी मुजफ्फीर खान, सचिव सुभाष घोडेस्वार, उपाध्यक्षपदी सौ ललिता गव्हांदे, सदस्यपदी पी.डी. जाधव, पवन छांगानी, शिवहरी मिरगे, गोपाल टोहरे, ज्योती तायडे, गोवर्धन डाबेराव, राजपालसिंग ठाकूर, शरद पारधी आदींचा समावेश आहे. या सभेला तालुक्यातील बहुसंख्या स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व पदाधिकारी व सदस्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना योग्य ते न्याय मिळुन द्यावा अशी ग्वाही देण्यात आली,

Previous Post Next Post