नवजात बालकाच्या पोटावर दिले सळईने चटके; भूमकावर गुन्हा दाखल दहेंद्री ढाणा येथील घटना..मेळघाटात पुन्हा अघोरी उपचार...


 
नवजात बालकाच्या पोटावर दिले सळईने चटके; भूमकावर गुन्हा दाखल दहेंद्री ढाणा येथील घटना..मेळघाटात पुन्हा अघोरी उपचार...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

मेळघाटात अंधश्रद्धेने कळस गाठला असून चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री येथील वीस दिवसांच्या बालकाच्या पोटावर लोखंडी सळईने चटके दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.दहेंद्री ढाणा येथील धोंडू शेलुकर यांच्या १८ दिवसांच्या नवजात मुलीच्या पोटाला फुगारा आला होता. पोटाचा हा आजार झाला की, मेळघाटातील आदिवासी त्यावर उपचार करण्यासाठी भूमकाचा सल्ला घेतात. १५ जून रोजी सुध्दा धोंडू शेलुकरने त्याच्या चिमुकलीच्या पोटाचा फुगारा बसण्यासाठी भूमकाला बोलाविले त्याने चक्क बाळाच्या पोटावर लोखंडी सळई गरम करून चटके दिले. या अघोरी उपचारामुळे बाळाला किती वेदना झाल्या असतील, याची कल्पनाही करणे अंगावर शहारे आणणारे आहे.१५ जून रोजी रिचमू धोंडू शेलुकर या महिलेला मुलगी झाली. त्यानंतर त्या मुलीला २५ जून रोजी पोटावर फुगारा आला. त्यामुळे २७जूनरोजी गावातील मेंजो कासदेकर (६०) नामक भुमका यांना याबाबत माहिती दिली असता मेंजो कास्देकरने पोटावर लोखंडी सळईने चटके दिले.हा प्रकार समजताच आशासेविका सौ. संगीता बेठेकर व गटप्रवर्तिका सौ. लता अलोकार यांनी शेलुकर कुटुंबाची भेट देऊन सदर प्रक पाहिला व तत्काळ आरोग्य सेविका व समुदाय आरोग्य अधिकारी यांना माहिती दिली. त्यानंतर बाळाला सरकारी रुग्णालयात भरती केले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहे.याबाबत चिखलदरा पोलिसस्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता अंतर्गत महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध कायदा अन्वये मेंजो कास्देकर याच्याविरोधात ११८ (१) ३,२, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post Next Post