सर्प मैत्रीण प्रतिभा ठाकरे यांचा सांभाजीनगर येथे सन्मान...जागतिक सर्पदिनाचे औचित्य साधून पारस चा सर्पमैत्रिन प्रतिभा ठाकरे यांना संभाजी नगर मध्ये केलं पुरस्कृत...
अकोला जिल्हा प्रतिनिधी....
नुकताच संभाजीनगर येथे पार पडलेल्या जागतिक सर्प दिन 2025 महोत्सव निमित्त पारसच्या सर्प मैत्रीण प्रतिभा ठाकरे यांना महिला सर्प मैत्रीण म्हणून पुरस्कार मिळाला.16 जुलै 2025 रोजी संभाजीनगर येथे हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन इंडियन नॅचरल हनी बिट्स पुणे स्वरदर्शन सांस्कृतिक व सामाजिक संस्था (ग्रामोदय प्रकल्प) वाळूज संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील धाडसी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील महिला ना सन्मान देण्यात आला. यावेळी पारसचा सर्प मैत्रीण प्रतिभा ठाकरे यांच्या कार्याला पाहता हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. प्रतिभा ठाकरे ह्या गृहिणी असून त्या वन्य जीव क्षेत्रात विशेष म्हणजे सर्पमैत्रीण म्हणून अकोला जिल्ह्यात कार्य करतात. प्रतिभाताई ठाकरे 9 नऊ वर्षापासून सर्प व वन्यजीव व तसेच संशोधन कार्य करीत असून नुकताच सरपटणाऱ्या जीव संबंधित आंतरराष्ट्रीय शोध निबंध रेपटाईल्स अँड एबेपिंन्स या शोधनिबंधा तुन अमेरिकेतून प्रकाशित (फास्ट रेकॉर्ड चंद्रपूर डिस्ट्रिक्ट ) हा शोध निबंध प्रकाशित केला असून चंद्रपूर जिल्ह्यात एक नवीन सापाची नोंद करण्यात आली त्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य दिले आहे तसेच अमेरिकेतील जागतिक दर्जाचा शौर्य सारख्या शोध निबंधात त्यांचे संशोधन आहेत जागतिक सर्प दिन 2025 हा कार्यक्रम माननीय खासदार डॉ. भगवतजी कराड (केंद्रीय अर्थमंत्री). प्रकाशजी देशमुख.सौ सुवर्ण माने. डॉ.दीप्ती पाटगावकर, सौ ज्योती अविनाश गायकवाड व पांडुरंग बामणे यांच्या शुभहस्ते कार्यक्रम घेण्यात आला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.